प.पु. विनायक उर्फ अण्णा राऊळ महाराज यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 15:24 IST2021-05-16T15:23:26+5:302021-05-16T15:24:32+5:30

सिंधुदुर्ग शोकसागरात: गोव्यासह मुंबईत मोठाभक्तगण

HH Vinayak alias Anna Raul Maharaj passed away | प.पु. विनायक उर्फ अण्णा राऊळ महाराज यांचे निधन

प.पु. विनायक उर्फ अण्णा राऊळ महाराज यांचे निधन

सिंधुदुर्ग : पिंगुळी येथील प.पु. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे अल्पशा आजाराने शनिवारी मध्यरात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निर्वतल्याची बातमी कळताच पिंगुळी गावासह सिंधुदुर्ग मधील भक्त परिवारात शोककळा पसरली आहे.

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प.पु.राऊळ महाराज यांचे पुतणे तसेच मठाचे कार्याध्यक्ष प.पु.विनायक अण्णा राऊळ महाराज यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, तिन भाऊ, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. विनायक अण्णा यांचा मुंबई सह गोव्यात मोठा भक्त गण आहे. अलिकडेच त्याचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने भक्तगणांना धक्काच बसला आहे.
 

Web Title: HH Vinayak alias Anna Raul Maharaj passed away