शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळाचा महिलेला फटका

By admin | Updated: November 9, 2014 23:28 IST

डॉक्टर व आरोग्य रुग्णवाहिकेचे चालक उपस्थित नसल्याने तेथे कोणीच पोहोचू शकले नाही,

आंबोली : आंबोली चुरणीची मुरू या धनगरवस्तीत अनिता बाबू झोरे या ३० वर्षीय महिलेची प्रसुती घरातच झाली. याबाबत आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता, चौकुळ उपविभागात हे कार्यक्षेत्र येत असल्याने सुषमा वंजारे या आरोग्य सेविका त्या ठिकाणी काम करीत असल्याची माहिती मिळाली. याबाबत वंजारे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र, आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.महिला अधूनमधून या ठिकाणच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येत होती. परंतु सध्या आंबोली आरोग्यकेंद्रात चालत असलेल्या डॉक्टरांच्या सावळ्या गोंधळामुळे या महिलेची प्रसुतीची तारीखच तिला माहिती नव्हती. कारण दर चार-पाच दिवसांनी या ठिकाणी डॉक्टर बदलत होते. असे असतानाही संबंधित भागातल्या आरोग्य सेविकेने याची नोंद करून घेऊन याबाबत योग्य पाठपुरावा गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. ६ नोव्हेंबरला या महिलेची प्रसुती तिच्या राहत्या घरी तुरणीची मूस येथे झाली. परंतु यावेळी डॉक्टर व आरोग्य रुग्णवाहिकेचे चालक उपस्थित नसल्याने तेथे कोणीच पोहोचू शकले नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांची कारवाईच्या भीतीने तारांबळ उडाली व त्यांनी लागलीच ७ नोव्हेंबर रोजी तोरणीची मूस गाठून त्या महिलेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन माता आणि बालकावर उपचार सुरू केले. परंतु काही काळाने तिच्या नातेवाईकांनी तिला जबरदस्तीने घरी नेले. यावेळी आंबोली केंद्रातून बाळ आणि मातेच्या पायाला जखमा झाल्याचे सांगितले. आमचे काहीही ऐकून घ्यायला तिचे पालक तयार नव्हते. आमचे आम्ही बघून घेऊ, असे सांगून तिला घरी नेण्यात आले. अशाचप्रकारे या महिलेचे पहिले बाळ अशा आडमुठ्या धोरणामुळे तीन वर्षांपूर्वी मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे पालकांच्या अज्ञानामुळे याही बाळावर उपचार न झाल्यास त्याच्या जिवीतास धोका पोहोचू शकतो, असे आरोग्यसेविका कोठावळे यांनी सांगितले. या घटनेमुळे आंबोलीच्या आरोग्य केंद्राचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. अंतर्गत कुरघोडी, पदाधिकाऱ्यांच्या मानपानावरून डॉक्टरांच्या बदल्या, अचानक रजा टाकून गायब होणारे डॉक्टर यामुळे आंबोली प्राथमिक आरोग्य केंदाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)