शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

मोपा विमानतळावरील भरतीत सिंधुदुर्गातील युवकांना प्राधान्य द्या, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजन तेलींची मागणी 

By अनंत खं.जाधव | Published: March 07, 2023 5:50 PM

सिंधुदुर्गला आयुष हॉस्पिटलचा फायदा होणार

सावंतवाडी : मोपा विमानतळावर भरती करताना पेडण्यासह सावंतवाडी, वेंगुर्ला व बांदा येथील स्थानिक युवकांना प्राधान्य द्या, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली.दरम्यान गोवा-बांबुळी येथील हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग मधील लोकांना प्राधान्याने सेवा दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पणजी येथे भेट घेतली. यावेळी  पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस महेश सारंग, एकनाथ नाडकर्णी, महेश धुरी, सुधीर दळवी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री सावंत म्हणाले, धारगळ येथे सुरू होत असलेल्या आयुष हॉस्पिटलचा फायदा हा आता सिंधुदुर्गला मोठ्या प्रमाणात होणार आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, त्यानंतर येथे रोजगाराच्या दृष्टीने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.मोपा विमानतळ पूर्ण ताकदीनिशी सुरू झाले आहे. भविष्यात या ठिकाणी विदेशी विमाने उतरणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी लागणार आहेत. पेडण्यासह सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला आदी जवळच्या भागातील युवकांना याठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तेली यांनी केली. याला सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सद्यस्थितीत बऱ्याचशा युवकांना या ठिकाणी रोजगार देण्यात आला आहे. भविष्यात सुद्धा नव्याने भरती असताना त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी विचार करण्यात येईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली Pramod Sawantप्रमोद सावंत