शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवापूर्वी स्थानकावर सुविधा द्या

By admin | Updated: July 9, 2015 23:57 IST

विनायक राऊत : रेल्वेसंदर्भात कुडाळ येथे बैठक

कुडाळ : गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील सोयीसुविधा सुरळीत करा व प्रवाशांना सुरक्षित प्रवास द्या, असे आदेश कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश तायल यांना खासदार विनायक राऊत यांनी कोकण रेल्वेच्या संदर्भातील कुडाळ येथील बैठकीत दिले. यावेळी त्यांनी या दोन महिन्यात प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्याचे आश्वासन खासदार राऊत यांना दिले. कोकण रेल्वेच्या सोयी सुविधांबाबत व सुरक्षित प्रवासाबाबत आढावा घेण्यासाठी व सूचना करण्यासंदर्भात खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ रेल्वे स्टेशनच्या विश्रामगृहात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला भानू प्रकाश तायल, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, उपसभापती आर. के. सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख दादा बेळणेकर, राष्ट्रवादीचे अमित सामंत, भास्कर परब, पंचायत समिती सदस्य बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, संजय भोगटे, छोटू पारकर उपस्थित होते. जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस व कडक उन्हाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून येथील रेल्वेस्थानकाच्या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर शेड उभारण्यात यावी. तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी रेल्वे पोलीस नेमावेत, तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या दलालांवर गुन्हा दाखल करावा, प्रकल्पग्रस्तांचा विचार करुन त्यांना नोकरीत समावून घ्यावे, रेल्वे रुळमार्गाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, रेल्वे प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे अनेक प्रश्न उपस्थितांनी मांडले. यावेळी राऊत यांनी सोयीसुविधा गणेशोत्सवाच्या पूर्वी निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)रेल्वे सुरक्षितच : तायलकोकण रेल्वे मार्ग सुरक्षित आहे व या रेल्वे मार्गाची तपासणी रेल्वे मंत्री प्रभूंच्या उपस्थितीत रेल्वे रूळ सुरक्षा समितीने केलेली असून, सुरक्षित रेल्वे मार्ग असा अहवाल दिलेला आहे. असे आतापर्यंत सुरक्षेसाठीच ६०० कोटी रूपये रेल्वेने खर्च केले असून, कोणीतरी उगाचच रेल्वेरूळ सुरक्षित नाही, असे सांगून अपप्रचार करू नये, असे तायल म्हणाले.रुग्णालय कुडाळमध्ये व्हावे यावेळी उपस्थितांनी कोकण रेल्वेच्या आराखड्यामध्येच कोकण रेल्वेचे रुग्णालय कुडाळ एमआयडीसीमध्ये प्रस्तावित आहे. त्यामुळे हे रुग्णालय कुडाळमध्येच व्हावे. तसेच हे रुग्णालय तत्काळ सुरू करायचे असल्यास कुडाळ ग्रामीण रुग्णालय किंवा येथील इंगेज रुग्णालयात सुरू करावे, यासाठी सर्वपक्षीय एकत्र येऊ, असे सांगितले.