शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

वनपाल, वनरक्षकांचा संप आश्वासनानंतर स्थगित

By admin | Updated: September 7, 2014 00:37 IST

विविध मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेने पुकारलेला संप अखेर शुक्रवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक व वन विभागाचे मुख्य सचिव यांनी विविध मागण्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन त्या पूर्ण करण्याच्या दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला. राज्यातील सर्व वनपाल, वनरक्षकांचा सुधारीत वेतनश्रेणीच्या मागणीसाठी २५ आॅगस्टपासून बेमुदत संप सुरू होता. २ सप्टेंबर रोजी संघटनेच्या प्रतिनिधींना प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी चर्चेसाठी बोलावून वनरक्षक-वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता वनरक्षक व वनपाल संघटनांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली होती. वेतनश्रेणी सुधारणा करण्याबरोबरच नियमित प्रवास भत्ता, वनरक्षक, वनपाल यांना अतिकर्तव्य भत्ता, कालवार पदोन्नती, वनरक्षक वनपालांच्या पदनामात वाढ करणे, आश्वासित प्रगती योजना लागू करणे आदी मागण्यांबाबत वन विभागाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक सक्सेना यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेकरिता बोलावून मागण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला. वन विभागाच्या वनपाल व वनरक्षकांचा संप तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी दिली. संघटनेने आचारसंहितेच्या शक्यतेमुळे संप तात्पुरता मागे घेतला आहे. मात्र, मागण्या तीन महिन्यात पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी प्रमोद राणे, द. बा. देसाई, दत्तगुरू पिळणकर, श्रीकृष्ण परीट, सूर्यकांत सावंत, सहदेव सावंत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)