शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लोककलाकारांनी एकसंघ व्हाव

By admin | Updated: August 25, 2014 22:09 IST

सतीश पाटणकर : वेंगुर्ले येथील लोककलाकारांच्या चर्चासत्रात प्रतिपादने

वेंगुर्ले : प्रत्येक लोककलेच्या अनेक संस्था कार्यरत असल्यामुळे शासन दरबारी निर्णय घेताना दबाव गट निर्माण होत नाही. या सर्व लोककला सादर करणाऱ्या कलाकार व संस्थांची एकत्रित संस्था कार्यरत झाल्यास शासनावर दबाव निर्माण होऊन या सर्व कलाकारांना अधिक योजनांचा फायदा मिळू शकतो. आज एम. के. गावडे प्रबोधिनी या चर्चासत्राच्या माध्यमातून लोककलाकारांना दिलेली हाक ही लोककला व कलाकार यांच्यासाठी उत्कर्षाचा मार्ग ठरेल, असे प्रतिपादन सतीश पाटणकर यांनी वेंगुर्ले येथे विविध लोककला कलाकारांच्या बैठकीत केले. वेंगुर्ले येथील साईदरबार सभागृहात एम. के. गावडे प्रबोधिनीच्यावतीने विविध लोककला सादर करणाऱ्या कलाकारांचे एकदिवशीय चर्चासत्र आयोजित केले होेते. या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी माहिती अधिकारी व लोककलेचे अभ्यासक सतीश पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ दशावतार कलाकार भिकाजी तांबे, अ‍ॅड. शशांक मराठे, सामाजिक कार्यकर्ते एम. के. गावडे, ज्येष्ठ दशावतारी कलावंत शिवराम वेतोरकर, आनंद नार्वेकर, नेमळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्माराम राऊळ, एम. के. गावडे, प्रबोधिनीच्या अध्यक्षा प्रज्ञा परब, प्रकाश गडेकर, दिनकर पालव, अंबरिश मांजरेकर, चपई लोकनृत्य कलाकार बाबू कोळेकर, गोफनृत्य कलाकार श्रीकांत चेंदवणकर उपस्थित होते. भिकाजी तांबे यांनी सर्व कलाकारांनी एकसंघ व्हावे, असे आवाहन केले. सिंधुदुर्ग जिल्हा कलाअकादमी स्थापन करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. कलाअकादमीला मूर्तस्वरूप आणण्याकरिता बैठक घेऊन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले. स्वागत प्रकाश गडेकर, आभार सुरेश कौलगेकर यांनी मानले. (प्रतिनिधी) कोकणातील लोककलेला व्यासपीठ निर्माण करून त्या कलेचे आणि कलाकारांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने कोकणातील सादर होणाऱ्या लोककलाकारांची सिंधुदुर्ग जिल्हा कला अकादमी या संस्थेची स्थापना करण्याचा एकमुखी ठराव या चर्चासत्रात घेण्यात आला.