निवती समुद्रात मच्छिमारी करणारी बोट उलटली; दोन खलाशी बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 11:08 IST2024-10-05T11:08:48+5:302024-10-05T11:08:59+5:30
ही बोट निवती येथील मच्छिमार आनंद धुरी यांची आहे.

निवती समुद्रात मच्छिमारी करणारी बोट उलटली; दोन खलाशी बेपत्ता
सिंधुदुर्ग: निवती समुद्रातुन मच्छिमारी करुन परत येत असताना बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन खलाशी समुद्रात बेपत्ता झाले आहेत. ही घटना पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
ही बोट निवती येथील मच्छिमार आनंद धुरी यांची आहे.या बोटीमध्ये 14 खलाशी होते.त्यातील दोन खलाशी बेपत्ता झाले आहेत तर इतरांनी दुर्घटनेनंतर किनारा गाठण्यात यश मिळवले.
घटनेची माहिती मिळताच निवती सरपंच अवधूत रेंगे यांना पहाटेच्या सुमारास घटनास्थळावर दाखल झाले आहेत तसेच बेपत्ता खलाशाचा ही शोध सुरू केला आहे.