ओसरगाव येथे राष्ट्रीय महामार्गालगत काजू-आंबा बागेला आग, लाखो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 15:56 IST2022-03-15T15:56:36+5:302022-03-15T15:56:59+5:30
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथील हॉटेल शर्मिला नजीक काजू, आंबा बागेला अचानक आग लागली. या आगीत बागायतदार ...

ओसरगाव येथे राष्ट्रीय महामार्गालगत काजू-आंबा बागेला आग, लाखो रुपयांचे नुकसान
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथील हॉटेल शर्मिला नजीक काजू, आंबा बागेला अचानक आग लागली. या आगीत बागायतदार शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली.
काजू, आंबा बागायतीस लागलेली आग लक्षात येताच ओसरगाव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते बबली राणे व स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध साधनांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले, परंतु भर दुपारच्या उन्हात आगीचा भडका आणखी उडाल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती.
कणकवली नगरपंचायतला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशामक बंब मागविण्यात आले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.