शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

साथरोग पसरण्याची भीती

By admin | Updated: October 30, 2014 00:46 IST

आरोग्य विभाग सतर्क : बदलत्या वातावरणाचा फटका

रजनीकांत कदम - कुडाळपरतीचा पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणेबरोबरच जनतेनेही सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाचे चार महिने संपून गेले, तरीही अधूनमधून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. परतीच्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात सगळीकडे साचते. त्यामुळे तापमानात कधी वाढ तर कधी थंडी असे बदल घडत राहतात. कधी पाऊस, कधी कडक ऊन तर कधी थंडी असे वातावरण वारंवार बदलत असल्याने याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. यासाठी आरोग्य विभागाबरोबरच जनतेनेही सतर्क राहून साथीच्या रोगांपासून दूर राहण्याबाबत उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर आहेच, शिवाय सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे साथीचे रोग पसरण्याचा. जिकडे तिकडे साचलेल्या डबक्यांमध्ये डासांची पैदास आताच्या उबदार वातावरणाुळे जोर धरणार असून या डासांमार्फत ताप किंवा अन्य साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत डासांचे प्रमाण वाढले असूनही यावर उपाययोजना करण्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसत आहे. कुडाळ शहराचाच विचार करता, शहरात अनेक ठिकाणी तुंबलेले गटार, वाढता कचरा, घाणीचे साम्राज्य हे डासांच्या उत्पत्तीचे मुख्य स्त्रोत ठिकठिकाणी दिसत आहेत. तरीही डासांच्या पैदासीला आळा घालण्यासाठी अथवा डासांचे निर्मूलन करण्यासाठी कोणतीही मोहीम हाती घेतलेली दिसत नाही. बदलत्या वातावरणामुळे शहराला डेंग्यू तापाच्या साथीला तोंड द्यावे लागले आहे. अशाचप्रकारचे रोग येण्यापूर्वीच उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. ‘ड्राय डे’ पाळला जात नाहीपाऊस पडून गेल्यानंतर डबकी आणि साचलेल्या पाण्याचे स्त्रोत नष्ट करून डासांची पैदास थांबविण्यासाठी शासनातर्फे ‘ड्राय डे’चे आयोजन केले जाते. परंतु ग्रामपंचायत पातळीवर या ‘ड्राय डे’चे पालन योग्य पद्धतीने केले जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच साथरोग नियंत्रणात आणणे अवघड होत आहे.