शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

बांदा नवभारत शिक्षण संस्थेविरोधात उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 11:21 IST

धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेने शासनमान्यता नसलेले व प्रत्यक्ष कार्यरत नसलेले ९ शिक्षक दाखवून त्यांच्या नावाने अनुदान लाटले आहे. यामुळे संस्थेचे व बांदा गावाचे नाव बदनाम होत आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा या शाळेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा भाजपचे पंचायत समिती सदस्य वसंत उर्फ शीतल राऊळ यांनी बुधवारी निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना दिले आहे.

ठळक मुद्देमाध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन ९ बोगस शिक्षक दाखवून फसवणूक केल्याचा आरोप

सिंधुदुर्गनगरी : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेने शासनमान्यता नसलेले व प्रत्यक्ष कार्यरत नसलेले ९ शिक्षक दाखवून त्यांच्या नावाने अनुदान लाटले आहे. यामुळे संस्थेचे व बांदा गावाचे नाव बदनाम होत आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा या शाळेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असा इशारा भाजपचे पंचायत समिती सदस्य वसंत उर्फ शीतल राऊळ यांनी बुधवारी निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना दिले आहे.या निवेदनात धी बांदा नवभारत शिक्षण मंडळ मुंबई या संस्थेच्या ९ माध्यमिक शाळा आहेत. संस्थेने २०१० ते २०१२ या कालावधीत ९ शिक्षकांच्या नेमणूक केल्याचे भासवून गेल्या दोन महिन्यात या बोगस शिक्षकांची शिक्षण खात्याकडून मान्यता मिळविली. २०१८-१९ च्या समायोजनात याच ९ शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव या संस्थेने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे.यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे ही समायोजन प्रक्रिया करू नये अशी मागणी केली होती. त्यानंतर शीतल राऊळ यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. मंत्री तावडे यांच्या आदेशानुसार संस्थेला खुलाशाची नोटीस बजावण्यात आल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.बोगस पटसंख्या दाखवून अनुदान लाटलेयाबाबत माहिती देताना संस्थेच्या कुडासे हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक प्रेमानंद नाडकर्णी यांनी, शिवसेनेचा दोडामार्ग तालुक्यातील जबाबदारी पदाधिकारी याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण यापूर्वी हा आरोप केला असता त्याने आम्ही स्वार्थासाठी आरोप करीत असल्याचे म्हटले होते. मात्र, आता माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी संस्थेला लेखी खुलासा देण्याची नोटीस बजावल्याने हे सर्वच उघड झाले आहे.

या संस्थेने यापूवीर्ही बोगस पटसंख्या दाखवून ४३ लाखांचे अनुदान लाटले होते. त्यानंतर या संस्थेच्या सहा शाळांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, कुडासे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजय परब उपस्थित होते. या निवेदनावर अन्य प्रतिष्टीत व्यक्तींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकsindhudurgसिंधुदुर्ग