अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई न केल्यास उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 08:25 PM2019-05-29T20:25:02+5:302019-05-29T20:27:10+5:30

कर्ली खाडीत बेसुमार व अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. याला अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास वाळू उत्खनन करणाऱ्यांकडून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. तरी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कडक कारवाई करावी अन्यथा खाडीपात्रातच आमरण उपोषण छेडू, असा इशारा देवली वाघवणे येथील रहिवाशांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Fasting does not take action against boats operating on unauthorized sand | अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई न केल्यास उपोषण

अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई न केल्यास उपोषण

Next
ठळक मुद्देअनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई न केल्यास उपोषणदेवली वाघवणे येथील रहिवाशांनी दिला इशारा

सिंधुदुर्गनगरी : कर्ली खाडीत बेसुमार व अवैध वाळू उत्खनन सुरू आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. याला अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास वाळू उत्खनन करणाऱ्यांकडून ग्रामस्थांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. तरी अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कडक कारवाई करावी अन्यथा खाडीपात्रातच आमरण उपोषण छेडू, असा इशारा देवली वाघवणे येथील रहिवाशांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

खाडीत संघर्ष झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे. अवैध वाळू उत्खननाविरोधात मंगळवारी देवली वाघवणे येथील विरेश मांजरेकर, सत्यवान चव्हाण यांसह अन्य ग्रामस्थांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने कर्ली खाडीतील पुलापासून दोन्ही बाजूस ६00 मीटर अंतर सोडून वाळू उपसा व साठा करण्यास परवानगी दिलेली असताना लिलावधारक १00 मीटर अंतरावर वाळू उपसा करीत आहेत. याला ग्रामस्थांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केल्यास धमकी व जीवे मारण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे मेरीटाईम बोर्ड व मालवण तहसीलदार यांचे लक्ष वेधूनसुद्धा अनधिकृत वाळू उत्खनन थांबलेले नाही.

देवली वाघवणे येथील रेती उपगट डी-५ मध्ये १५ होड्यांची परवानगी असताना त्याठिकाणी ५0 होड्या दिवस-रात्र बेसुमार वाळू उपसा करीत आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. खार बंधाऱ्यांवरून वाळू वाहतूक होत आहे. येथील रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

अनधिकृत वाळू उत्खननामुळे खार बंधारा वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जर पूरस्थिती निर्माण झाली आणि खार बंधारा फुटला तर २५0 लोकवस्तीची एक वाडी वाहून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे, असेही म्हटले आहे.

Web Title: Fasting does not take action against boats operating on unauthorized sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.