सावंतवाडीतील बनावट मनी लाँड्रिंगचे धागेदोरे देशभरात, मुंबईतून दोघे ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:10 IST2025-12-06T16:10:28+5:302025-12-06T16:10:28+5:30

ज्येष्ठ नागरिकाला मनी लाँड्रिंगच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल ९७ लाख रुपयांचा गंडा घातला; पंजाब, दिल्ली, आसाम येथील काही आरोपींचा समावेश

Fake money laundering links from Sawantwadi spread across the country, two arrested from Mumbai | सावंतवाडीतील बनावट मनी लाँड्रिंगचे धागेदोरे देशभरात, मुंबईतून दोघे ताब्यात 

सावंतवाडीतील बनावट मनी लाँड्रिंगचे धागेदोरे देशभरात, मुंबईतून दोघे ताब्यात 

सावंतवाडी : मुंबई क्राइम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवून एका अज्ञात सायबर गुन्हेगाराने एका ज्येष्ठ नागरिकाला मनी लाँड्रिंगच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल ९७ लाख रुपयांचा गंडा घातला होता. या घटनेनंतर सायबर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत तपास करत मुंबई येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, सायबर पोलिसांकडून जो तपास करण्यात आला त्यात या घटनेची पाळेमुळे संपूर्ण भारतात पसरली असल्याचे निष्पन्न झाले. पंजाब, दिल्ली, आसाम येथील काही आरोपींचा यात समावेश आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेची पाळेमुळे संपूर्ण भारतात पसरली असून सायबर पोलिसांच्या कल्पकतेने दहा लाख रुपये वसूल करण्यात यश आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये विष्णू बांदेकर (वय ५७, रा. अंधेरी, मुंबई), तर समशेर खान (रा. मुंबई) यांचा समावेश आहे.

सावंतवाडीमधील अज्ञात पीडित ज्येष्ठ नागरिकाला व्हाॅट्सॲप व्हिडीओ कॉल करून मुंबई क्राइम ब्रँच अधिकारी असल्याची बतावणी करत, तुमच्या खात्यातून २५ लाखांचा व्यवहार मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. त्वरित मुंबईत या किंवा आम्ही सांगतो तशी ऑनलाइन चौकशीला सामोरे जावा, अशा धमक्या देऊन त्यांना मानसिक दडपण आणले.

कायदेशीर अडचणीत सापडण्याची भीती मनात आल्याने पीडिताने आपली दामदुप्पट योजनेतून तसेच म्युच्युअल फंड आणि शेअर्समधील सुमारे ९७ लाख रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे संशयिताच्या बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर केले आणि ते सायबर शिकारीचे बळी ठरले होते. मात्र, नंतर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला असता त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.

Web Title : सावंतवाड़ी मनी लॉन्ड्रिंग घोटाला: देशव्यापी संबंध, मुंबई में दो गिरफ्तार

Web Summary : सावंतवाड़ी के एक वरिष्ठ नागरिक को मनी लॉन्ड्रिंग घोटाले में ₹97 लाख का नुकसान हुआ। साइबर पुलिस ने नेटवर्क को देशव्यापी स्तर पर खोजा, मुंबई से दो गिरफ्तार। घोटाले में व्हाट्सएप वीडियो कॉल के माध्यम से धमकियां शामिल थीं, पीड़ितों पर धन हस्तांतरण करने का दबाव डाला गया। पुलिस ने ₹10 लाख बरामद किए।

Web Title : Sawantwadi Money Laundering Scam: Nationwide Links, Two Arrested in Mumbai

Web Summary : A Sawantwadi senior citizen lost ₹97 lakhs in a money laundering scam. Cyber police traced the network nationwide, arresting two from Mumbai. The scam involved threats via WhatsApp video calls, with victims pressured to transfer funds. Police recovered ₹10 lakhs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.