Sindhudurg: वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:52 IST2025-10-03T18:51:47+5:302025-10-03T18:52:37+5:30

Sindhudurg Tourists Drowned: एका मुलीला वाचविण्यात यश; उर्वरित चौघांचा शोध सुरु 

Eight tourists from Belgaum go missing in Shiroda Velagar sea, bodies of three found | Sindhudurg: वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

Sindhudurg: वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

Sindhudurg Tourists Drowned: शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळी साठी जाणे बेळगाव तसेच कुडाळ येथील कित्तूर व मणियार कुटुंबियांच्या जीवावर बेतले असून तब्बल आठ जण समुद्राच्या लाटेत बेपत्ता झाले. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. एका मुलीला वाचविण्यात यश आले आहे. तर उर्वरित चार जणांचा शोध घेण्याचे काम सुरू असून उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. समुद्रात उतरणाऱ्यांमध्ये सहा जण बेळगाव तर दोघेजण कुडाळ येथील असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वेळागर सुरूची बागे समोर घडली असून शोधकार्य मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.स्थानिक मच्छीमार लाईफ गार्ड च्या मदतीने चार जणांचा शोध घेण्यात येत आहे.हा प्रकार समुद्राची आलेली लाट आणि  किनाऱ्यावर असलेला खोल खड्डा यामुळे घडला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

समुद्रात बुडालेल्यांमध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले असून यात फरीन इरफान कित्तूर (३४ )इबाद इरफान कित्तूर (१३) नमीरा आफताब अखतार (१६ सर्व रा.लोढा बेळगाव)येथील आहेत. तर बेपत्ता असलेल्या मध्ये इरफान मोहम्मद इसाक कित्तूर (३६)इकवान इमरान कित्तूर (१५ दोन्ही रा.लोंढा बेळगाव)
फराहान महम्मद मणियार (२५)जाकीर निसार मणियार वय (१३ कुडाळ सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. वाचविण्यात यश आलेल्या इसरा इम्रान कित्तूर (17 रा.लोढा बेळगाव) येथील असून सर्व प्रकार तिच्या समोर घडला आहे.

बेळगाव लोढा येथील कित्तूर कुटुंबिय आपल्या कुडाळ येथील नातेवाईकांकडे आले होते. तेथे त्यांनी शुक्रवार दुपारी जेवण केले. त्यानंतर बारा जण चारच्या सुमारास शिरोडा वेळागर येथील समुद्र किनाऱ्यावर निघाले होते. पाच वाजण्याच्या सुमारास वेळागर येथील समुद्र किनाऱ्यावर पोचले. त्यानंतर यातील आठ जण आंघोळीसाठी पाण्यात उतरले होते. यात लहान मुलांपासून मोठ्या माणसे होती. हे सर्वजण मौजमजा करत आंघोळ करत  असतनाच समुद्रात पहिल्या पासून उधाण होते. त्यातच  समुद्रात एक  मोठी लाट आली आणि यातील एका पर्यटकांचा पाय खड्ड्यात गेला आणि तो लाटे बरोबर आतमध्ये ओढला गेला.

त्याला वाचविण्याच्या नादात बाकीच्यांनी ऐकामेकांना धरण्याचा प्रयत्न केला आणि त्यात हे सर्वजण खोल समुद्रात ओढले गेले. किनाऱ्यावर खड्डा असल्याने त्यांचे पाय रुतले आणि सर्वजण क्षणार्धात बेपत्ता झाले. ही घटना किनाऱ्यावर असलेल्या इतर नातेवाईकांनी बघताच त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी स्थानिक धावून आले आणि त्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत सर्वजण खोल समुद्रात बेपत्ता झाले होते.

इसारा कित्तूर ही मुलगी मात्र आश्चर्यकारक रित्या वाचली.घटनेनंतर काहि वेळातच तिघांचे मृतदेह आढळून आले तर इतर चार जण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महसूल प्रशासनाला माहिती दिल्यानंतर  प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना ही करण्यात आल्या आहेत. उशिरापर्यंत घटनास्थळा वर पोलिस स्थानिक मच्छीमार लाईफ गार्ड या सर्वांकडून बेपत्ताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

मुलीचे नशीब बलवत्तर 

इसरा कित्तूर ही मुलगी आठ जणांबरोबर समुद्रात उतरली होती. पण तिचे नशीब बलवत्तर पाण्याचा वेग मोठा असतानाही ती या लाटेच्या तोंडातून बाहेर आली. तिला इतर नातेवाईकांनी बाहेर काढले. पण तिचा आक्रोश जीवघेणा होता. तिचे सर्वच कुटुंबिय बेपत्ता झाले आहे.
 

Web Title : सिंधुदुर्ग: बेलगाम के आठ पर्यटक लापता, तीन के शव बरामद

Web Summary : सिंधुदुर्ग के शिरोडा वेळागर बीच पर बेलगाम के आठ पर्यटक लापता हो गए। तीन शव बरामद हुए, एक महिला को बचाया गया। शेष चार की तलाश जारी है।

Web Title : Sindhudurg: Eight Belgaum Tourists Missing, Three Dead in Sea

Web Summary : Eight tourists from Belgaum went missing at Shiroda Velagar beach in Sindhudurg. Three bodies were recovered, and one woman was rescued. Search operations are ongoing for the remaining four.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.