शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या नियोजनात प्रत्येक घटकाचा सहभाग घेणार

By admin | Updated: July 9, 2015 23:53 IST

दीपक केसरकर : जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे उद्घाटन

ओरोस : जिल्ह्याचा विकास हा सर्व समावेशक असावा. नियोजनात प्रत्येक घटकाचा सहभाग सर्वांच्या विचारविनिमयाने होणे आवश्यक आहे. नूतन जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्ह्याच्या विकासाचे केंद्रस्थान बनविणार आहे. जिल्ह्यातील शेवटच्या घटकाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर असल्याचे मत वित्त, ग्रामविकास व नियोजन राज्यमंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.नूतन जिल्हा नियोजन समिती सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार विजय सावंत, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डी. टी. शिंदे, माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.केसरकर पुढे म्हणाले, पर्यटन पर्यावरणाशी सांगड घालून पर्यटनावर व कृषी उत्पादनावर आधारीत रोजगार प्रत्येक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून पाच वर्षात राबविण्यात येणाऱ्या योजना अभ्यासपूर्वक राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व ठिकाणी निश्चितच जिल्हा सुंदर असला पाहिजे अशी कल्पना आपण करतो. ही कल्पना सत्यात उतरली आहे असे पालकमंत्री केसरकर म्हणाले. जिल्हा नियोजन सभागृह हे देखील जुन्याइतकेच नवीन सुंदर साकारले गेले आहे. सुविधा जादा आणि बसण्यास कमी जागा याकरीता नवीन सभागृह आवश्यक होते हे लक्षात घेऊन नवीन बांधण्यात आले.प्रास्ताविक करताना जिल्हा नियोजनचे अधिकारी हरिबा थोरात म्हणाले, सभागृह हे एकूण ३ कोटी ७२ लाख ३७ हजार इतकी रक्कम खर्च करून उभारण्यात आले आहे. आवाराची ही इमारत मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आली आहे. सभागृह हे मिनी थिएटर्स आहे. कोल्हापूर येथील प्रसिद्ध वास्तु विशारद समीर जोशी यांनी इमारतीचा नेटका आराखडा तयार केला गेला आहे. यामध्ये लाईट प्रोजेक्टर रुम, व्हीआयपी कक्ष, डायस व डायसच्या पाठिमागे सत्ताधारी व विरोधी गटाच्या नेत्यांना दोन स्वतंत्र व्हीआयपी कक्षाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसेच १४ महनीय व्यक्ती बैठक व्यवस्था सभागृहात २०० खुर्च्या अशाप्रकारे नूतन इमारतीत व्यवस्था करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकात थोरात यांनी सांगितले.या कार्यक्रमावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व विशेष परिश्रम घेणाऱ्या व्यक्तींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)