शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
3
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
4
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
5
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
6
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
7
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
8
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
9
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
10
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
11
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
12
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
13
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
14
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
15
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
16
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
18
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
19
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
20
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

श्रेय लाटण्याचा खटाटोप करु नये

By admin | Updated: November 24, 2014 23:13 IST

दीपक केसरकर : दोडामार्ग येथील कार्यक्रमात प्रतिपादन

कसई दोडामार्ग : राज्य सरकारने मंजूर केलेल्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य करतात, ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणारी बाब आहे. मतदारांनी जागा दाखविली, तरी श्रेय लाटण्याचा खटाटोप कायम आहे, अशी टीका शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे केली. बाळासाहेबांनी राज्यात संघटीत केलेली शिवसेना नवीन उंचीवर नेऊया, असे आवाहन यावेळी आमदार केसरकर यांनी केले. दोडामार्ग येथील लक्ष्मी सभागृहात दोडामार्ग शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख प्रकाश रेडकर तालुकाध्यक्ष बाबूराव धुरी, गणेशप्रसाद गवस, विशाखा देसाई, पांडुरंग नाईक, संजय देसाई, संजय गवस, गोविंद महाले आदी उपस्थित होते. आमदार केसरकर म्हणाले, सत्तेत स्थान न मिळाल्यामुळे काही जण नाराज आहेत, असे समजते. परंतु शिवसेनेला काम करण्यासाठी सत्तेची गरज नसून सत्तेशिवाय विकास कामे करण्याची धमक शिवसैनिकात आहे, हे दाखवून द्या. तालुक्यातील तिराळी प्रकल्पग्रस्तांचा, तिलारी कामगारांचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, कुडासे पुलाचा प्रश्न, विर्डी धरणाचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यसरकारमध्ये सध्या केवळ दहाच मंत्री असल्याने बरीच खाती सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्यात येणार आहेत. तालुक्यातील समस्यांबाबत लवकरच आमसभा घेण्यात येणार आहे. पंतप्रधान सडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. कुडासे पूल मंजूर असून त्याचे टेंडर लवकरच काढून हा प्रश्नही मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदार केसरकर यांनी स्पष्ट केले. मार्केटमध्ये अ‍ॅलल मिश्रित तसेच सायनीस केमिकल डांबर आले आहे. त्यामुळे डांबराची खात्री करूनच रस्त्याची कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)