शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

देवगड पोलीस ठाण्याची इमारत मोडकळीस

By admin | Updated: January 8, 2015 00:04 IST

दरवर्षी डागडुजी : कर्मचारीच सोसतात आर्थिक भुर्दंड; इमारतीच्या नूतनीकरणाची मागणी

योगेश तेली राणे - देवगड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या देवगड पोलीस स्टेशनची इमारत जीर्ण झाली आहे. या निवासी इमारतीची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. या इमारतीत राहणारे कर्मचारीच इमारतीची डागडुजी करून रहात आहेत. पावसाळ्यात तर कौलांमधून पाण्याच्या धाराच वाहू लागतात. प्लास्टिकचे कागद बांधून पाण्याच्या धारा बंद कराव्या लागतात. दरवर्षी डागडुजी करून आर्थिक भुर्दंड सोसूनही कायमस्वरूपी त्यावर योग्य अशी कार्यवाही होत नसल्याने हा त्रास येथील पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो.पोलिसांची राहण्याची सोय व्यवस्थित नसल्याने पोलिसांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस यंत्रणेला २४ तास आॅन ड्युटी करावी लागते. येथे रहात असलेल्या पोलिसांच्या घरांची दारे व खिडक्या मोडकळीस आल्या आहेत.तालुक्यातील देवगड पोलीस स्टेशन महत्त्वाचे आहे. मात्र, निवासी वापरासाठी सुसज्ज व सोयीनियुक्त इमारतीची व्यवस्था केल्यास पोलिसांची कार्यक्षमताही वाढणार आहे. पोलीस स्टेशनअंतर्गत काही महत्त्वाच्या कार्यक्रमांवेळी बाहेरून पोलीस येत असतात. मात्र, त्यांच्या राहण्याची येथे गैरसोय होत असल्याने त्यांना कामाबाबत दक्ष राहणे शक्य होत नाही. देवगड पोलीस स्टेशनची जीर्ण इमारत नूतनीकरण करून पोलिसांच्या निवासी सोयीसुविधा पूर्ण व्हाव्यात जेणेकरून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण व्हावे, अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांमधून होत आहे. सोयी-सुविधांकडे दुर्लक्षया इमारतीची डागडुजी नियमित होत नसल्याने स्थानिक पोलिसांनाच याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तालुक्यातील इतर कार्यालये सुस्थितीत व नव्या इमारतीत असल्याने पोलीस स्टेशनसारख्या कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या यंत्रणेलाही सर्वसोयींनीयुक्त निवासी इमारतीची गरज आहे. बंद इमारतीची दुरूस्ती गरजेचीजुन्या पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेली नादुरुस्त निवासी इमारत पूर्णत: बंद अवस्थेत आहे. हीच इमारत व्यवस्थित केली तर पोलिसांच्या निवासाचा प्रश्न सुटणार आहे. या जीर्ण इमारतीतच पोलीस ठाण्याचा गणपतीही विराजमान होतो.