सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडीहून आपल्या पाडलोस येथील बहिणीला भेटायला चाललेल्या दीपक विठ्ठल पाटकर (३५, रा. समाजमंदिर, सावंतवाडी) हा रेल्वेरूळ ओलांडून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मंगला एक्स्प्रेसची धडक बसून जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मडुरा रेल्वे स्थानक परिसरात घडली.दीपक हा रिलस्टार म्हणून प्रसिद्ध होता. त्याला ‘बेडूक भाई’ या नावाने रिल प्रसिद्ध झाल्या होत्या.सावंतवाडी समाजमंदिर परिसरात राहणारा दीपक हा गेली अनेक वर्षे मिळेल ते काम करत होता. तो सावंतवाडीत कधीही फिरताना दिसत असे. तो लोकांचे, युवकांचे मनोरंजन करत असे त्यामुळे तो अनेकांच्या लक्षात होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने सोशल मीडियावर ‘बेडूक भाई’ हे नवीन पेज सुरू केले होते.या माध्यमातून तो लोकांना हसवणारे व्हिडिओ तयार करून टाकत होता. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर त्याने आपला एक असाच व्हिडिओ तयार केला होता. त्यात ‘तुम्ही आनंदी राहा, सगळ्यांना सुद्धा आनंदात राहायला सांगा’, असा संदेश दिला होता.
Web Summary : Deepak Patkar, known as 'Beduk Bhai' for his online videos, died near Madura station after being struck by a train while visiting his sister. He was 35.
Web Summary : सावंतवाड़ी के दीपक पाटकर, जो 'बेडूक भाई' के नाम से मशहूर थे, अपनी बहन से मिलने जाते समय मडुरा स्टेशन के पास ट्रेन से टकराकर मर गए। वह 35 वर्ष के थे।