शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या भाऊगर्दीतून सर्वांसाठी निर्णय; भाजप कार्यकर्त्यांची नाराजी मिटवण्यासाठी नितेश राणेंचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:09 IST

आगामी निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तीन पक्षांची तडजोड झाली असून, नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला मान्य असणारा निर्णय घेतला जाईल. भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी साहजिकच आहे, परंतु सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात असून त्यांचे समाधान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे मत पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी कणकवलीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आगामी निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तीन पक्षांची तडजोड झाली असून, नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीबाबत स्पष्ट केले की, "प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी आहे आणि प्रत्येकाला मान्य असणारा निर्णय घेतला जाईल." नारायण राणेंचा शब्द अंतिम मानला जात असून, सर्व संवादात तोच निर्णय घेणारा आहे. "सत्तेतील सर्व पदे आमच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळणार असून, कोणीही वंचित राहणार नाही. "थोडा वेळ द्या, कुठलीही किंतू नाही," असे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे सांगितले. महायुती म्हणून निवडणूक लढवताना नाराजी होणारच, परंतु इच्छुक आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल.

भाई सावंत कडवट कार्यकर्ताही निवडणूक राणेंच्या नेतृत्वाखाली लढवली जात असून, भाई सावंत हे निष्ठावान आणि कडवट कार्यकर्ता आहेत. "प्रत्येकाला ऐकून घेतोय," असे सांगत त्यांनी सर्वांशी संवाद साधण्याचा संदेश दिला. "उद्या सकाळपर्यंत राजकीय परिस्थिती पाहून पक्षप्रवेश जाहीर होईल," असे सांगत त्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांची ओळख करुन दिली.

अंतिम निर्णयावर विश्वास ठेवावाराणे म्हणाले, "प्रत्येकाला मान्य असणारा निर्णय घेणार असून, आमचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे."या पत्रकार परिषदेत, नितेश राणे यांनी राजकीय घडामोडी आणि बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या नेतृत्वाखालील अंतिम निर्णयावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५BJPभाजपा