इच्छुकांच्या भाऊगर्दीतून सर्वांसाठी निर्णय; भाजप कार्यकर्त्यांची नाराजी मिटवण्यासाठी नितेश राणेंचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 15:09 IST2026-01-19T15:09:18+5:302026-01-19T15:09:47+5:30

आगामी निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तीन पक्षांची तडजोड झाली असून, नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Decision for all through the brotherhood of those who are interested; Nitesh Rane's attempt to resolve the displeasure of BJP workers | इच्छुकांच्या भाऊगर्दीतून सर्वांसाठी निर्णय; भाजप कार्यकर्त्यांची नाराजी मिटवण्यासाठी नितेश राणेंचा प्रयत्न

इच्छुकांच्या भाऊगर्दीतून सर्वांसाठी निर्णय; भाजप कार्यकर्त्यांची नाराजी मिटवण्यासाठी नितेश राणेंचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे प्रत्येकाला मान्य असणारा निर्णय घेतला जाईल. भाजप कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी साहजिकच आहे, परंतु सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात असून त्यांचे समाधान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे मत पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी कणकवलीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आगामी निवडणुकीत भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तीन पक्षांची तडजोड झाली असून, नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यावेळी नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीबाबत स्पष्ट केले की, "प्रत्येक ठिकाणी इच्छुकांची भाऊगर्दी आहे आणि प्रत्येकाला मान्य असणारा निर्णय घेतला जाईल." नारायण राणेंचा शब्द अंतिम मानला जात असून, सर्व संवादात तोच निर्णय घेणारा आहे. "सत्तेतील सर्व पदे आमच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांना संधी मिळणार असून, कोणीही वंचित राहणार नाही. "थोडा वेळ द्या, कुठलीही किंतू नाही," असे आवाहन करत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे सांगितले. महायुती म्हणून निवडणूक लढवताना नाराजी होणारच, परंतु इच्छुक आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल.

भाई सावंत कडवट कार्यकर्ता
ही निवडणूक राणेंच्या नेतृत्वाखाली लढवली जात असून, भाई सावंत हे निष्ठावान आणि कडवट कार्यकर्ता आहेत. "प्रत्येकाला ऐकून घेतोय," असे सांगत त्यांनी सर्वांशी संवाद साधण्याचा संदेश दिला. "उद्या सकाळपर्यंत राजकीय परिस्थिती पाहून पक्षप्रवेश जाहीर होईल," असे सांगत त्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांची ओळख करुन दिली.

अंतिम निर्णयावर विश्वास ठेवावा
राणे म्हणाले, "प्रत्येकाला मान्य असणारा निर्णय घेणार असून, आमचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे."या पत्रकार परिषदेत, नितेश राणे यांनी राजकीय घडामोडी आणि बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांच्या नेतृत्वाखालील अंतिम निर्णयावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले.

Web Title: Decision for all through the brotherhood of those who are interested; Nitesh Rane's attempt to resolve the displeasure of BJP workers