Sindhudurg- बांदा तेरेखोल नदी पात्रात आढळला मृतदेह, उडाली एकच खळबळ

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 3, 2023 11:13 IST2023-04-03T11:12:38+5:302023-04-03T11:13:12+5:30

 बांदा ( सिंधुदुर्ग ) : बांदा आळवळी येथील तेरेखोल नदीपात्रात आज, सोमवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने ...

Dead body found in Sindhudurg-Banda Terekhol river | Sindhudurg- बांदा तेरेखोल नदी पात्रात आढळला मृतदेह, उडाली एकच खळबळ

Sindhudurg- बांदा तेरेखोल नदी पात्रात आढळला मृतदेह, उडाली एकच खळबळ

 बांदा (सिंधुदुर्ग) : बांदा आळवळी येथील तेरेखोल नदीपात्रात आज, सोमवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी याबाबत बांदा पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक समीर भोसले पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही.

मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली.

Web Title: Dead body found in Sindhudurg-Banda Terekhol river