शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

दापोली : शालेय विद्यार्थ्यांकडे अश्लिल क्लिप्स

By admin | Updated: September 20, 2014 00:21 IST

याप्रकरणी हायस्कूल प्रशासनाने तब्बल १४ मुलांना निलंबित केले आहे. त्यातील ३ विद्यार्थ्यांना शाळेतून आपला दाखला काढून दिल्याचीही चर्चा

दापोली : दापोलीतील एका हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांकडे अश्लिल व्हिडिओ क्लिप्स सापडल्या असून या क्लिप्स याच शाळेतील मुलींच्या असल्याची चर्चा दापोलीत ऐकायला मिळत आहे. एवढेच नव्हे तर इयत्ता ९वीतील मुले अंमली पदार्थ वापरतानाही काहींनी पकडले असून याप्रकरणी हायस्कूल प्रशासनाने तब्बल १४ मुलांना निलंबित केले आहे. त्यातील ३ विद्यार्थ्यांना शाळेतून आपला दाखला काढून दिल्याचीही चर्चा जोरात आहे. याबाबत दापोलीतील ऐकू येत असलेली चर्चा अशी की, शहरातील एका प्रतिष्ठीत हायस्कूलमध्ये नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत चालू असताना शहरातील एका प्रतिष्ठीत बांधकाम व्यावसायिकाच्या ९वीत शिकणाऱ्या मुलाचा मोबाईल खणखणला. हायस्कूलमध्ये मोबाईल वापरावरच बंदी असताना या विद्यार्थ्याने हा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणला कसा? याबाबत अधिक चौकशी करता या मोबाईलमध्ये काही अश्लिल व्हिडीओ क्लिप असल्याचे निदर्शनास आले. मात्र वर्गशिक्षकांनी सखोल चौकशी केली असता या साऱ्या प्रकरणात शाळेतील तब्बल १४ विद्यार्थी-विद्यार्थीनी सामील असल्याची चर्चा ऐकावयास मिळाली.याच ग्रुपमधील काही मुलांना आझाद मैदानात असणाऱ्या इमारतीमध्ये शालेय विद्यार्थी अंमली पदार्थांचे सेवन करत असतानाच काहींनी पकडले. त्यामुळे या विषयाची चर्चा दापोली शहरासह तालुक्यातही ऐकावयास मिळाली. या साऱ्या प्रकरणाची मग हायस्कूलच्या प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली. आठ दिवसांपूर्वी ९ वी व ११ वीतील तब्बल १४ मुलांना हायस्कूलमधून निलंबित करण्यात आले व त्यांच्या पालकांना याची कल्पना देण्यात आली. मात्र दोनच दिवसापूर्वी बंद खोलीमध्ये झालेल्या बैठकीत पालक व शाळा प्रशासनामध्ये वादावादी होऊन १४ पैकी ३ विद्यार्थ्यांना शाळेतूनच काढून टाकण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. (प्रतिनिधी)१४ मुलांना केले निलंबित.तिघा विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याचीही चर्चा.आणखी एका ‘क्लिप्स’प्रकरणाने दापोली हादरले.नववीतील मुले अंमली पदार्थ वापरतानाही पकडल्याची चर्चा.