शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर मातांना घडतोय धोकादायक प्रवास ...

By admin | Updated: May 3, 2014 17:05 IST

शासनाने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना चांगली असली तरी त्याचा ताण सीपीआरमधील प्रसूती विभागावर पडत आहे. प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांवर उपचार करण्यास चालढकल केली जात आहे.

बाजीराव जठार (वाघापूर) : शासनाने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना चांगली असली तरी त्याचा ताण सीपीआरमधील प्रसूती विभागावर पडत आहे. प्रत्येक तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांवर उपचार करण्यास चालढकल केली जात आहे. गर्भवती महिलांना रुग्णवाहिकेतून दूर अंतरावरून आणताना त्यांचा प्रवासही धोकादायक बनत असल्याचे वास्तव पुढे येत आहे. त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून बहुतांशी गर्भवती महिलांना सीपीआरमध्ये पाठविले जाते. त्यामुळे सीपीआरमध्ये रुग्णांना सुविधा देताना कसरत करावी लागत आहे. जिल्‘ातील ग्रामीण भागात ११० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत तसेच ६ ग्रामीण रुग्णालये आहेत. आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी येतात. अनेकवेळा येथे महिलांची किरकोळ तपासणी करून थेट सीपीआरकडे पाठवून दिले जाते. त्यासाठी १०८ या दूरध्वनी क्रमांकावर मिळणारी जननी सुरक्षा अभियानातील रुग्णवाहिका बोलावून घेतली जाते व त्या गाडीतून सीपीआरकडे पाठविले जाते, अशा गर्भवतींना घेऊन भरधाव वेगाने वाहतुकीचे अडथळे चुकवत सीपीआरच्या दिशेने येतात. दिवसाला किमान १५ ते २० गर्भवती सीपीआरमध्ये दाखल होतात. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले जातात. सीपीआरमध्ये प्रसूती विभागात ६५ बेड आहेत. त्यातील प्रसूतीसाठी किमान ४० बेड वापरले जातात व इतर उपचारासाठी दाखल केलेल्या महिलांसाठी उर्वरित बेड वापरले जातात. येथे उपचार घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या बेडच्या संख्येपेक्षा जास्त महिला दाखल होतात. त्यामुळे या विभागाला अक्षरश: कसरत करून येथे सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. यामुळे गर्भवती महिलांचा प्रवास धोकादायक होतो. सीपीआरमध्ये कमी बेडची संख्या असल्याने गर्दी होते. काहीवेळेला फरशीवरच झोपावे लागते. त्याचा बाळंतिणीला त्रास होतो. सीपीआरमध्ये बाळंतिणींना दाखल करण्यासाठी शाहूवाडी, गगनबावडा, शिरोळ, गारगोटी, चंदगड अशा तालुक्यातील गावांतून रुग्णवाहिका सीपीआरपर्यंत आणल्या जातात. रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढती आहे. ते अडथळे दूर करत येथे महिलांना आणले जाते. या सार्‍यातून रुग्णवाहिकांची सोय चांगली असली तरीही रस्त्यावरील प्रवासाचा धोका मात्र वाढतो आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातून सीपीआरमध्ये महिलांना पाठविण्याची वृत्ती ही गैरसोय व धोका वाढविणारी आहे. त्यामुळे या सुविधेला दिशा देण्याची गरज आहे. बातमी जोड देत आहे.