CoronaVirus Lockdown : देवगडातून मजूर आपल्या गावी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:39 IST2020-05-19T13:39:01+5:302020-05-19T13:39:10+5:30
देवगड : देवगड आगारातून २० गाड्यांमधून ४२६ परप्रांतीय मजुरांना ओरोस रेल्वेस्थानक येथे पाठविण्यात आले. केंद्र तसेच राज्यशासनांनी राज्यातील जिल्हानिहाय ...

देवगड आगारातून २० गाड्यांमधून ४२६ परप्रांतीय मजुरांना ओरोस रेल्वेस्थानक येथे पाठविण्यात आले.
ठळक मुद्देदेवगडातून मजूर आपल्या गावी रवाना
देवगड : देवगड आगारातून २० गाड्यांमधून ४२६ परप्रांतीय मजुरांना ओरोस रेल्वेस्थानक येथे पाठविण्यात आले.
केंद्र तसेच राज्यशासनांनी राज्यातील जिल्हानिहाय अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांचा गावी रेल्वेने सोडण्यात येत असून देवगड येथून शनिवारी ४२६ परप्रांतीय मजुरांना २० गाड्यांनी ओरोस रेल्वे स्थानक येथे सोडण्यात आले. यावेळी प्रत्येक गाडीतून एक महसूल कर्मचारी पाठविण्यात आला.
परप्रांतीय मजुरांना घेऊन देवगड आगारातून गाड्या सोडण्यात आल्या. नायब तहसिलदार प्रिया परब, आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण, स्थानकप्रमुख गोरे तसेच महसूल व एसटीचे कर्मचारी उपस्थित होते.