शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

CoronaVirus : जिल्हा कोरोनामुक्तीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन,नीतेश राणे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 5:49 PM

कणकवली : सिंधुदुर्ग कोरोनामुक्त करण्यासाठी हा अ‍ॅक्शन प्लॅन असून जनतेने त्याला साथ द्यावी, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी येथे ...

ठळक मुद्दे जिल्हा कोरोनामुक्तीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन, नीतेश राणे यांची माहिती१० लाख होमिओपॅथी गोळ्यांचे होणार वाटप, कणकवली तालुक्यातून सुरुवात

कणकवली : सिंधुदुर्ग कोरोनामुक्त करण्यासाठी हा अ‍ॅक्शन प्लॅन असून जनतेने त्याला साथ द्यावी, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.

 आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या १० लाख आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे जिल्ह्यात वाटप करण्याचा संकल्प केला आहे. त्याचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील ५ लाख गोळ्यांचे वाटप कणकवली तालुक्यातून सुरू करण्यात येणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्त व्हावा हे माझे स्वप्न आहे, असे राणे म्हणाले. ओसरगांव येथील महिला भवन येथे ते बोलत होते. यावेळी वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे डॉ. श्रीराम हिर्लेकर तसेच मनीष दळवी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा आॅरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये यायला हवा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि तापसरी डोके वर काढत असते. तर हीच कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे यासाठीच रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्या जिल्ह्यातील प्रत्येक लहान-थोर नागरिकाला देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोळ्या तयार करताना पूर्ण दक्षता घेण्यात येत आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्येक जिल्हावासीयाला या होमिओपॅथी गोळ्या देण्यात येणार आहेत. एकदा गोळ्यांचे वाटप केल्यानंतर एक महिन्यानंतर पुन्हा दुसऱ्या डोसचे वाटप केले जाणार आहे. यासाठी तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांच्या टीमचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

यावेळी डॉ. श्रीराम हिर्लेकर म्हणाले, केवळ कोरोनाच नव्हे तर पावसाळ्यात होणारे व्हायरल इन्फेक्शन या गोळ्यांमुळे दूर होईल. सकाळी उपाशीपोटी तीन गोळ्यांचा सलग ३ दिवस डोस घ्यावा लागेल. हे औषध घेतल्यानंतर कॉफी पिऊ नये. या डोसमुळे एक महिनाभर रोगप्रतिकारकशक्ती टिकेल.

महिन्यानंतर पुन्हा या गोळ्यांचा डोस घ्यावा. गोळ्या वाटप करताना मूळ सिंधुदुर्गवासीय, होम क्वारंटाईन आणि संस्थात्मक क्वारंटाईन असा तीन पद्धतीने डाटा गोळा केला जाणार आहे.असा डाटा देशात प्रथमच तयार केला जात असेल. त्यामुळे आमदार नीतेश राणेंच्या या उपक्रमाची जागतिक आरोग्य संघटनेलाही दखल घ्यावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, या गोळ्या पॅकिंग कशा करतात? याचे प्रात्यक्षिकही यावेळी दाखविण्यात आले.चार केंद्रे स्थापनआयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्या आपले रक्षण निश्चितच करतील. या गोळ्या तयार करताना पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात चार केंद्रांवर या गोळ्या तयार होत आहेत.

वेंगुर्ला, सावंतवाडी, ओसरगाव महिला भवन आणि हरकुळ बुद्रुक येथील एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गोळ्यांचे पॅकिंग सुरू आहे. प्रत्येक घरी जाऊन स्वयंसेवक या गोळ्या घरपोच करतील. तसेच संबंधित व्यक्तींची नावे नोंद करून कुटुंबप्रमुखाची सही नावांच्या यादीवर घेणार आहेत, असेही नीतेश राणे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग