शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

संततधार सुरूच

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

सिंधुदुर्गात वृद्ध वाहून गेल्याची भीती : बांद्यात घरावर कोसळले झाड

सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील घोडगे-पायरवाडी येथील अनंत शंकर आंगचेकर (वय ७५) हे ओहोळाकडे शौचालयास गेले होते. ते बराच वेळ झाला तरी परत न आल्याने वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच आहे. बांदा शहरातील निमजगावाडी येथील सखाराम सावंत यांच्या राहत्या घरावर झाड कोसळून नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले. घोडगे-पायरवाडी येथील अनंत आंगचेकर हे शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून गायब होते. ते घराशेजारच्या ओहोळातून वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांचा ओहोळाच्या व नदीच्या किनारी शोध घेण्यात आला. मात्र, शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते सापडले नाहीत. शुक्रवारी सकाळपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे आंगचेकर यांच्या घराशेजारील ओहोळही तुडुंब भरून वाहत होता. अशावेळी अनंत आंगचेकर तिकडे गेल्याने ते वाहून गेल्याची शक्यता उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभर बांदा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. निजमगा येथील महापुरुष देवस्थाननजीक असलेले पिंपळाचे भले मोठे झाड नजीकच्या घरावर पडले. यामध्ये सखाराम मुकुंद सावंत यांच्या घराचे ८६ हजार २५० रुपयांचे, तर वैशाली अशोक सावंत यांच्या घराचे दोन हजार ८५0 रुपयांचे नुकसान झाले. भुईबावडा घाटातील वाहतूक विस्कळीत गगनबावड्यापासून दोन किलोमीटर अंतरावर भुईबावडा घाटात रस्त्यावर झाड व दरड कोसळल्याने खारेपाटण-गगनबावडा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत बांधकामचे कर्मचारी तेथे पोहोचले नव्हते. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती.