शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार काँग्रेसने पोसला

By admin | Updated: July 27, 2014 00:38 IST

वामन मेश्राम : महाजागरणअंतर्गत कणकवलीत मेळावा

कणकवली : स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉँग्रेसने भ्रष्टाचार आणि जातीयवादाच्या आधारे निवडणुका जिंकल्या आहेत. तसेच विशिष्ट जातीला प्राधान्य देत बहुजन समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे कारस्थान कॉँग्रेसने केले. आम्ही या देशात गुलाम असून आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. महाजागरण अभियानांतर्गत येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. उमेश सावंत, शबाना मुल्ला, राजरत्न आंबेडकर, मिशा मेश्राम, मामा माडये, एकनाथ तेली, प्रताप भोसले, नगरसेवक गौतम खुडकर, अनिल डेगवेकर, नंदू आरोलकर आदी उपस्थित होते. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेपासूनच निवडणुका या गडबड करून जिंकल्या गेल्या. नेहरूंनी विशिष्ट समुदायाचा जातीवाद गुप्तपणे राबवला. राज्यात ज्या जातीचे प्राबल्य त्यांना कॉँग्रेसने दिल्लीत आमचे सरकार आणा राज्यात तुमचे सरकार बनवू असे आमिष दाखवून जातीयवाद पोसला. या राजकारणातूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बनवून मराठावाद निर्माण केला. उमेदवारांना निवडणुकीसाठी मर्यादेपेक्षा जास्त पैसा पुरवण्याचे कॉँग्रेसनेचे सुरू केले. निवडणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा याच पैशांच्या ताकदीने पराभव करण्यात आला. आजही कॉँग्रेस निवडणुकीसाठी शेकडो कोटी रूपये खर्च करते. त्यासाठी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा उभा केला जात आहे. पुढील काळात कॉँग्रेसने मतदान प्रक्रियेतच गौडबंगाल करण्यास सुरूवात केली. गुंडांच्या माध्यमातून बूथ कॅप्चरिंग करण्यासही सुरूवात केली. आणि याच गुंडांना पुढे तिकीटही देऊ केली. १९६७ च्या पुढील निवडणुकांमध्ये गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना पैसे देऊ करण्यात आले आणि त्यानंतर घरोघर पैसा वाटण्यात आला. पैसे वाटप करून निवडणुका जिंकण्याची कामे करण्यात आली, असे आरोप वामन मेश्राम यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)