धोकादायक साकव, पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद करा; पालकमंत्री नितेश राणेंनी दिले निर्देश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:22 IST2025-06-17T16:22:26+5:302025-06-17T16:22:46+5:30

जिल्ह्यातील पूल, साकवांच्या सद्य:स्थितीचा घेतला आढावा

Close dangerous canals, bridges for public use; Guardian Minister Nitesh Rane gives instructions | धोकादायक साकव, पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद करा; पालकमंत्री नितेश राणेंनी दिले निर्देश 

धोकादायक साकव, पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद करा; पालकमंत्री नितेश राणेंनी दिले निर्देश 

सिंधुदुर्गनगरी : पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूल आणि साकवांच्या सद्य:स्थितीबाबतचा आढावा पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. जिल्ह्यातील धोकादायक साकव, तसेच पूल नागरिकांच्या वापरासाठी तत्काळ बंद करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. 

नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साकवांच्या शेजारी साकव नादुरुस्त असल्याचा फलक लावा. जेणेकरून दुर्घटना होणार नाही. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी गांभीर्यपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

वाचा - सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल ४०६ साकव नादुरुस्त, सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी दिली माहिती

राष्ट्रीय महामार्गाबाबत निर्देश देताना ते म्हणाले, पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करा. रस्ते दुरुस्तीचे काम दर्जेदार झाले पाहिजे. जेणेकरून वारंवार ही समस्या निर्माण होणार नाही.  यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,  शेलार,  महेंद्र किणी,  पवार,  सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Close dangerous canals, bridges for public use; Guardian Minister Nitesh Rane gives instructions