कुडाळच्या नगराध्यक्षांची दुचाकी चोरली; दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 04:03 PM2019-08-03T16:03:17+5:302019-08-03T16:05:08+5:30

कुडाळ नगराध्यक्षांच्या दुचाकीसह अन्य दोन दुचाकी चोरीप्रकरणी कुडाळ पोलिसांनी राजापूर पोलीस ठाण्यात अटक असलेले जयप्रकाश चिंदरकर (२६, रा. नागवे), विशाल नाईक (३०, रा. तळेरे) या दोघा संशयितांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

The city president of Kudal stole the bike; Both in possession | कुडाळच्या नगराध्यक्षांची दुचाकी चोरली; दोघे ताब्यात

कुडाळच्या नगराध्यक्षांची दुचाकी चोरली; दोघे ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देकुडाळच्या नगराध्यक्षांची दुचाकी चोरली; दोघे ताब्यातकुडाळ पोलिसांची कारवाई : राजापूर येथे होते अटकेत

कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षांच्या दुचाकीसह अन्य दोन दुचाकी चोरीप्रकरणी कुडाळ पोलिसांनी राजापूर पोलीस ठाण्यात अटक असलेले जयप्रकाश चिंदरकर (२६, रा. नागवे), विशाल नाईक (३०, रा. तळेरे) या दोघा संशयितांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

१८ जुलै रोजी रात्री कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांची त्यांच्या दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरीला गेल्याचे समजताच तेली यांनी याबाबत कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. या प्रकरणाचा कुडाळ पोलीस तपास करीत असतानाच कुडाळ द्वारका पार्क येथे राहणारे सुधीर म्हाडदळकर यांची दुचाकी व कसाल येथील कदम यांची दुचाकी कसाल येथून गुरुवारी रात्री चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एकाच रात्री तीन दुचाकी चोरीला गेल्याचे समजताच पोलीस प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची माहिती वायरलेस यंत्रणेद्वारे सर्व पोलीस ठाण्याना कळविली.

दरम्यान, शुक्रवारी पहाटे तपासणी करताना राजापूर पोलिसांनी सिंधुदुर्गहून रत्नागिरीच्या दिशेने दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना थांबवून अधिक चौकशी करीत त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता ते समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे राजापूर पोलिसांना त्या चौघांचाही संशय आला व त्यांनी त्या चौघांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असता कुडाळ येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना राजापूर पोलिसांनी अटक केली होती.

कुडाळ पोलीस ठाण्यात या दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याने कुडाळ पोलिसांनी या जयप्रकाश व विशाल या दोन संशयितांना राजापूर पोलीस ठाण्यातून ताब्यात घेत बुधवारी रात्री कुडाळ येथे आणले. या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या चोरलेल्या दुचाकी कुठे नेल्या जात होत्या. त्या दुचाकींचे ते काय करणार होते. यामागे नेमके कोणाचे कनेक्शन आहे याचा तसेच या अगोदर जिल्ह्यातील इतर काही ठिकाणच्या दुचाकी चोरीमध्येही या संशयितांचा हात आहे का याचाही तपास करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

Web Title: The city president of Kudal stole the bike; Both in possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.