शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारकडून फसवणूक

By admin | Updated: September 29, 2014 00:02 IST

नारायण राणे : कणकवलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात टीका

कणकवली : देशात ५२ वर्षे कॉँग्रेसची सत्ता होती. कॉँग्रेसने देश घडविला. मात्र, आमिषे दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने १२० दिवसांत जनतेची फसवणूक केली, असे प्रतिपादन पालकमंत्री नारायण राणे यांनी केले. नीतेश राणे यांनी कॉँग्रेसतर्फे अर्ज दाखल केल्यानंतर मराठा मंडळ सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, नीलम राणे, नगराध्यक्षा अ‍ॅड.प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते. अच्छे दिन आने वाले है, महागाई कमी करू, असे लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगितले जात होते. मात्र, महागाई कमी करण्यात आली नाही आणि अच्छे दिन आलेच नाहीत. उलट ३० टक्के महागाई वाढली आणि वाईट दिवस पाहण्याची वेळ देशाच्या जनतेवर आली आहे. एकशेवीस दिवसांत लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. वातावरण बदलत असले तरी गाफील राहू नका. लोकसभेच्या वेळी गाफील राहिल्याने नॉनमॅट्रिक असलेला माणूस खासदार झाला. आज हा खासदार इथल्या माणसांसाठी दुर्मीळ झाला आहे. तो फक्त थापा मारण्यात एक्स्पर्ट आहे, अशी खासदार विनायक राऊत यांच्यावर पालकमंत्री नारायण राणे यांनी केली. याउलट मतदारसंघात महिन्याचे वीस दिवस देऊन नीलेश राणे यांना अपयश आले याचे दु:ख आहे. लोकसभेत जे कटु अनुभव आले त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. (प्रतिनिधी)‘त्यांचा’ मुलाहिजा ठेवणार नाहीया निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय होताना तुम्हा कार्यकर्त्यांसाठी मी भरपूर वेळ देईन. विरोधक आणि गद्दारांची लक्तरे काढीन, असे नारायण राणे यांनी सांगितले. खाल्ल्या अन्नाला न जागणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे राजन तेली यांचे नाव न घेता त्यांच्यावर राणे यांनी टीका केली.