करुळ घाटात सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला, भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:24 IST2026-04-02T16:23:15+5:302026-04-02T16:24:06+5:30

Accident News: करुळ घाट उतरुन वैभववाडीकडे येणारा सिमेंटच्या पिशव्या भरलेला ट्रक घाटातील ३०० फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी(ता.२) पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

Cement truck falls into a valley in Karul Ghat, two people die in a horrific accident | करुळ घाटात सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला, भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू

करुळ घाटात सिमेंटचा ट्रक दरीत कोसळला, भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू

सिंधुदुर्ग - करुळ घाट उतरुन वैभववाडीकडे येणारा सिमेंटच्या पिशव्या भरलेला ट्रक घाटातील ३०० फूट दरीत कोसळला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी(ता.२) पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

कोल्हापूरहून सिमेंटची पोती भरुन निघालेला ट्रक (क्रमांक केए:२८; एए-५५४५) करुळ घाटातून वैभववाडीकडे येत होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सिमेंटचा हा ट्रक सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच वैभववाडीचे पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर व पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी अपघातस्थळी पोहोचले. तसेच बचावकार्यासाठी करुळ येथील सह्याद्री वनजीव रक्षक पथकाचे हेमंत पाटील व त्यांचे सहकाऱ्यांना पाचारण केले.

अपघातस्थळी पोहोचताच दरीत उतरुन बचावकार्य सुरु केले. परंतु, तत्पूर्वीच ट्रकसोबत दरीत कोसळलेले दोघांचे मृतदेह आढळले. पोलिस व सह्याद्री जीवरक्षक पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढले. आले. अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसून, वैभववाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title : करुल घाट में सीमेंट ट्रक खाई में गिरा, दो की मौत

Web Summary : सिंधुदुर्ग के करुल घाट में सीमेंट से भरा ट्रक 300 फीट गहरी खाई में गिर गया, जिससे दो लोगों की मौके पर ही मौत हो गई। दुर्घटना गुरुवार सुबह करीब 5 बजे हुई। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Cement truck plunges into valley in Karul Ghat, two dead.

Web Summary : A cement truck fell into a 300-foot valley in Karul Ghat, Sindhudurg, killing two. The accident occurred around 5 AM on Thursday. Police and rescuers recovered the bodies. Investigation is underway.