अश्लील मेसेज प्रकरणी दोन भामटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:40 IST2019-02-06T17:39:28+5:302019-02-06T17:40:32+5:30

बनावटी फेसबुक खाते तयार करून महिलांना अश्लील संदेश पाठवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. यातील एकाला बांदा उभाबाजार येथून तर दुसºयाला आंब्रड (कुडाळ) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

In the case of the porn message, two detonators have been arrested | अश्लील मेसेज प्रकरणी दोन भामटे ताब्यात

अश्लील मेसेज प्रकरणी दोन भामटे ताब्यात

ठळक मुद्देअश्लील मेसेज प्रकरणी दोन भामटे ताब्यातस्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : एक बांदा तर दुसरा आंब्रड येथील

सिंधुदुर्गनगरी : बनावटी फेसबुक खाते तयार करून महिलांना अश्लील संदेश पाठवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले आहे. यातील एकाला बांदा उभाबाजार येथून तर दुसºयाला आंब्रड (कुडाळ) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बनावटी फेसबुक खाते तयार करून जिल्ह्यातील महिलांना अश्लील संदेश पाठविणे, त्यांच्याशी अश्लील संभाषण करणे, तसेच त्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रकारची जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी गंभीर दखल घेत अशा गुह्यांचा तपास करून ते उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक तयार करण्यात आले होते.

या पथकाने विशेष अभ्यास करत माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत निवती पोलीस ठाणे व मालवण पोलीस ठाणे मध्ये दाखल गुह्यांमधील आरोपींना अटक केली आहे. यात निवती पोलीस ठाण्यातील गुन्ह्याखाली बांदा उभाबाजार येथून एका आरोपीला तर मालवण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याखाली कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षकांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीता कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस, कृष्णा केसरकर, रवि इंगळे, अमित तेली, प्रथमेश गावडे, भक्ती सावंत यांनी केली.

...तर नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्या

जर आपल्याला अशा प्रकारे अश्लील संदेश येत असतील तसेच अश्लील संभाषण करून कोण त्रास देत असल्यास महिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात जावून तक्रार द्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी केले आहे.
 

Web Title: In the case of the porn message, two detonators have been arrested