शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा निर्घृण खून, कणकवलीत उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:02 IST

कणकवली मुडेश्वर मैदानाजवळ मोहनमळा येथे आढळला मृतदेह 

कणकवली: शहरातील बांधकाम व्यवसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुशांत जनार्दन दळवी (वय ४० रा-कणकवली, मुळ रा. कळसुली) यांचा गोळी मारुन खून केल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दळवी यांचा मृतदेह शहराला पाणी पुरवठा करणा-या टाकीनजीक मोहनमळा येथे २० ते २५ फूट फरफटत नेलेल्या अवस्थेत आढळून आला. खुनाचे नेमके कारण काय? तो कोणी केला? याबाबत पोलिसांनी तपासाची जोरदार सूत्रे हलवली आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, अप्पर पोलिस अधिक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची टीम, फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले आहेत. दळवी यांचा खून झाल्याची घटना समजताच माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, हरकुळ बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर, वागदे सरपंच संदीप सावंत यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.  सुशांत दळवी कणकवली शहर तसेच परिसरात बांधकाम व्यवसाय करत होते. मुडेश्वर मैदान जवळ मोहन मळा येथे शेख यांच्या घरात काही भाडेकरु राहतात. त्यापैकी एका तरुणाला शुक्रवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह आढळून आला. त्यांनी शेख यांना कळवले. त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. गुरुवारी रात्री असे काय घडले? की त्यामुळे सुशांत दळवी यांचा खून झाला ? याचा तपास पोलिस करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. प्राथमिक तपासात सुशांत दळवी यांच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागून गंभीर जखम झाल्याचे दिसून येत आहे. त्यांना शिकारीचाही छंद होता. अशी माहिती पोलिस तपासात पुढे येत आहे. त्यामुळे पोलिस वेगवेगळ्या अंगाने तपास करत आहेत. मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Builder Sushant Dalvi Murdered in Sindhudurg, Panic in Kankavli

Web Summary : Builder Sushant Dalvi was shot dead near Kankavli, causing widespread panic. Police are investigating the murder, discovering the body with gunshot wounds. Initial investigations suggest a possible motive related to his business or personal life. The investigation is ongoing to determine the exact cause and identify the perpetrator.