Sindhudurg: नवाबाग समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 13:31 IST2023-04-11T13:30:56+5:302023-04-11T13:31:13+5:30

वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

Body of woman found on Nawabagh beach | Sindhudurg: नवाबाग समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह आढळला

Sindhudurg: नवाबाग समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह आढळला

वेंगुर्ला : उभादांडा - नवाबाग किनाऱ्यावर सोमवारी (दि.१०) सुमारे ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबत स्थानिकांनी पोलिस ठाण्याला दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

उभादांडा- नवाबाग समुद्र किनाऱ्यावर सोमवारी दुपारच्या सुमारास आढळून आलेल्या मृत महिलेबाबतची माहिती स्थानिक मच्छीमार नीलेश खड़पकर यांनी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर, हवालदार योगेश वेंगुर्लेकर व पोलिस हवालदार अनुराधा देसाई हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह वेंगुर्ला तालुक्याच्या परिसरातील असावा, अशी शक्यता स्थानिक मच्छीमारांतून वर्तविली जात आहे.

मृत महिला ही सुमारे ५ फूट उंचीची, गोऱ्या रंगाची, मध्यम बांध्याची, लाल रंगाचा ब्लाउज परिधान केलेली, केस थोडे पांढरट-काळे रंगाचे आहेत. अशा प्रकारच्या महिलेबाबत कोणालाही माहिती असल्यास वेंगुर्ला पोलिस ठाण्याला कळवावे, असे आवाहन वेंगुर्ला पोलिस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनुराधा देसाई करत आहेत.

Web Title: Body of woman found on Nawabagh beach