शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नूतनीकरण थांबल्याने बोटी बंद; मच्छिमारी ठप्प

By admin | Updated: October 17, 2014 22:52 IST

डिझेल परतावाही मिळण्याची कोणतीही शक्यता नाही.

देवगड : देवगड बंदरातील मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी बंदरात हजर नसल्यामुळे मच्छिमारांची मोठी गैरसोय होत असून अनेक बोटींचे परवाने नूतनीकरण झालेले नसल्याने या बोटी मच्छिमारीपासून वंचित राहिल्या आहेत. या बोटींचे परवाना नूतनीकरण झालेले नसल्याने त्यांना डिझेल परतावाही मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. याचाही फटका मच्छिमारांना बसत आहे. याबाबत मत्स्य विभागाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था झालेली नसल्याने बंदरातील मच्छिमार वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. देवगड बंदरातील सुमारे ८ ते ९ मच्छिमारी यांत्रिकी नौकांचा परवाना आॅगस्टअखेर संपत होता. काहींचा सप्टेंबर मध्यात संपला. त्यामुळे या परवान्यांचे नूतनीकरण होणे मत्स्य नौकांच्या मच्छिमारी हंगामासाठी अत्यावश्यक होते. संबंधित नौका मालक आवश्यक ते सर्व कागदपत्र घेऊन परवाना अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले असता संबंधित अधिकारी एक महिन्याच्या रजेवर गेले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र, रजेवर गेलेल्या अधिकाऱ्यांच्या कामाचा चार्ज अन्य कोणाकडे आहे का? अशी विचारणा केली असता याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच परवाना नुतनीकरणसुद्धा कधी करण्यात येईल याचीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे गेले अनेक दिवस हे यांत्रिकी मच्छिमारी नौकाधारक आपल्या बोटी मच्छिमारीसाठी समुद्रात नेऊ शकत नाहीत. जर बेकायदेशीरपणे परवान्याशिवाय हे मच्छिमार समुद्रात गेले तर त्यांच्याविरोधात हेच खाते कायदेशीर कारवाई करेल, शिवाय सुरक्षा एजन्सीसुद्धा कारवाई करू शकतील या भीतीपोटी हे सर्व मच्छिमार मच्छिमारी बंद ठेऊन किनाऱ्यावर राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार व तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच परवाना नुतनीकरणाची सुविधा त्वरित उपलब्ध व्हावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.डिझेल परतावाही प्रलंबितमच्छिमारांचा डिझेल परतावा मिळण्याचा कार्यक्रम फेब्रुवारी ते सप्टेंबर २०१४ या काळात ठप्प होता. तो न मिळाल्याने मच्छिमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर शुक्रवारी त्यांना हा परवाना मिळण्यास सुरूवात होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, मच्छिमारांनी याबाबत पाठपुरावा न थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)