शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली बसस्थानकात भाजपाकडून आघाडी शासनाचा निषेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:49 IST

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला अतिशय चांगली सेवा देत आहेत. त्यांना कामाचा मोबदला वेळेवर न मिळाल्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामूळे व बिघाडी कामामूळे कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. असा आरोप करीत भाजपच्यावतीने कणकवली बसस्थानक परिसरात राज्य सरकारचा मंगळवारी निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देकणकवली बसस्थानकात भाजपाकडून आघाडी शासनाचा निषेध !एसटी कर्मचाऱ्यांना वेतन अदा न केल्याने आंदोलन ; विभाग नियंत्रकाना निवेदन

कणकवली : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला अतिशय चांगली सेवा देत आहेत. त्यांना कामाचा मोबदला वेळेवर न मिळाल्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामूळे व बिघाडी कामामूळे कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. असा आरोप करीत भाजपच्यावतीने कणकवली बसस्थानक परिसरात राज्य सरकारचा मंगळवारी निषेध करण्यात आला.या आंदोलनाच्यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यासाठी बसस्थानकप्रमुख निलेश लाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी बाबू मुळदेकर यांच्यासह एसटीचे अधिकारी उपस्थित होते. तर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, सोनू सावंत, महेश गुरव, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, दिलीप तिर्लोटकर , आप्पा सावंत , पपू पुजारे तसेच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते.यावेळी विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कदायक घटना घडत आहेत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊन काळामध्ये कर्मचाऱ्यांना सांभाळणे हे कुटुंबप्रमुख म्हणून राज्य सरकारचे कर्तव्य आहे .

हे कर्तव्य पार पाडण्यात सरकार पूर्ण अयशस्वी झालेले आहे . कर्मचाऱ्यांच्या या सर्व भावनांचा भारतीय जनता पार्टी , कणकवली आदर करून त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे . आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन व त्यांच्या गरजा भागवण्यास विलंब केला तर भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असेही या निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :state transportएसटीBJPभाजपाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग