कणकवली बसस्थानकात भाजपाकडून आघाडी शासनाचा निषेध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 14:49 IST2020-11-10T14:46:16+5:302020-11-10T14:49:36+5:30
राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला अतिशय चांगली सेवा देत आहेत. त्यांना कामाचा मोबदला वेळेवर न मिळाल्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामूळे व बिघाडी कामामूळे कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. असा आरोप करीत भाजपच्यावतीने कणकवली बसस्थानक परिसरात राज्य सरकारचा मंगळवारी निषेध करण्यात आला.

कणकवली बसस्थानक परिसरात राज्य सरकारचा निषेध करीत कणकवली तालुका भाजपा तर्फे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी राजन तेली, संतोष कानडे, महेश गुरव, सोनू सावंत, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.
कणकवली : राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी ग्रामीण भागातील जनतेला अतिशय चांगली सेवा देत आहेत. त्यांना कामाचा मोबदला वेळेवर न मिळाल्यामुळे राज्यात कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामूळे व बिघाडी कामामूळे कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. असा आरोप करीत भाजपच्यावतीने कणकवली बसस्थानक परिसरात राज्य सरकारचा मंगळवारी निषेध करण्यात आला.
या आंदोलनाच्यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यासाठी बसस्थानकप्रमुख निलेश लाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी बाबू मुळदेकर यांच्यासह एसटीचे अधिकारी उपस्थित होते. तर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, सोनू सावंत, महेश गुरव, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, दिलीप तिर्लोटकर , आप्पा सावंत , पपू पुजारे तसेच भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित होते.
यावेळी विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचे वेतन दिले गेले नसल्याने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कदायक घटना घडत आहेत . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊन काळामध्ये कर्मचाऱ्यांना सांभाळणे हे कुटुंबप्रमुख म्हणून राज्य सरकारचे कर्तव्य आहे .
हे कर्तव्य पार पाडण्यात सरकार पूर्ण अयशस्वी झालेले आहे . कर्मचाऱ्यांच्या या सर्व भावनांचा भारतीय जनता पार्टी , कणकवली आदर करून त्यांच्या पूर्ण पाठीशी आहे . आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतन व त्यांच्या गरजा भागवण्यास विलंब केला तर भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असेही या निवेदनात म्हटले आहे.