देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:00 IST2024-12-13T18:00:06+5:302024-12-13T18:00:45+5:30

महायुतीचे नऊ विरूद्ध आठ संख्याबळ झाल्याने फायदा

BJP appoints Devgad Jamsande Nagar Panchayat Subject Committee Chairman | देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा

देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा

देवगड : देवगड - जामसंडे नगरपंचायत विषय समिती  सभापतीपदाची व महिला बालकल्याण उपसभापतीपदाच्या निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपप्रणित देवगड - जामसंडे नगरविकास समितीने बाजी  मारली. बांधकाम समिती सभापतीपदी गटनेते शरद ठुकरुल, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापतीपदी  प्रणाली माने, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी  आद्या गुमास्ते, तसेच महिला बालकल्याण उपसभापती ऋचाली पाटकर यांची निवड झाल्याचे निवडणूक पीठासन अधिकारी कातकर यांनी जाहीर केले.

देवगड - जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती व महिला बालकल्याण उपसभापतीपदाची निवडणूक बुधवारी नगरपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय तथा पीठासन अधिकारी जगदीश कातकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगरपंचायतीचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक व नगरसेविका आदी उपस्थित होते.

 नगरपंचायत सभागृहात झालेल्या या विषय समिती सभापती निवडीनंतर बांधकाम समितीत सदस्यपदी तन्वी चांदोस्कर, निवृत्ती उर्फ व बुवा तारी, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सदस्यपदी  स्वरा कावले व संतोष तारी, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यपदी विशाल मांजरेकर, मनीषा जामसंडेकर, तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी ऋचाली पाटकर आदींची निवड करण्यात आली.

 नगरपंचायतीवर यापूर्वी शिवसेना गटाची सत्ता होती. त्यावेळी नऊ सदस्य संख्या असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीचे सदस्य भाजपच्या गटात सामील झाल्याने सद्यस्थितीत महाविकास आघाडीमहायुतीची संख्या ८ विरूद्ध ९ झाल्याने नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे.

भाजपकडून अभिनंदन

देवगड - जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपचे विषय समिती सभापती विराजमान झाल्यानंतर भाजप नेते बाळा खडपे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर, संतोष किंजवडेकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये, महिला तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर, संजना आळवे, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहराध्यक्ष योगेश पाटकर, दयानंद पाटील, संजय तारकर, गणपत गावकर, मिलिंद माने, रवींद्र चिंदरकर, सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी अभिनंदन केले.

Web Title: BJP appoints Devgad Jamsande Nagar Panchayat Subject Committee Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.