औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा अपहार; महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 02:23 PM2019-11-13T14:23:18+5:302019-11-13T14:25:11+5:30

कणकवली तालुक्यातील दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत सहकाऱ्यांसह कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राजक्ता प्रकाश कदम (४६, रा. कलमठ, कणकवली) या महिलेला सोमवारी अटक केली. तब्बल १ कोटी २२ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा अपहार झाला असून, उपलेखा परीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून १२ संशयितांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

Billions of abductions in industrial establishments; The woman was arrested | औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा अपहार; महिलेला अटक

औद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा अपहार; महिलेला अटक

Next
ठळक मुद्देऔद्योगिक संस्थेत कोट्यवधीचा अपहार; महिलेला अटक१२ जणांवर गुन्हा दाखल : आर्थिक गुन्हा शाखेकडे तपास

कणकवली : कणकवली तालुक्यातील दिगवळे येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत सहकाऱ्यांसह कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्राजक्ता प्रकाश कदम (४६, रा. कलमठ, कणकवली) या महिलेला सोमवारी अटक केली. तब्बल १ कोटी २२ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा अपहार झाला असून, उपलेखा परीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून १२ संशयितांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

दरम्यान, प्राजक्ता कदम हिला कणकवली न्यायालयात मंगळवारी हजर केले असता न्यायाधीश एस. ए. जमादार यांनी १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे ११ जुलै २००८ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत कार्यरत असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी ही अफरातफर केली असल्याचे उप लेखापरीक्षकांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

या संस्थेला शासनाने अदा केलेल्या रकमेपैकी ९८ लाख ९६ हजार ६४० रुपये व सभासदांकडून जमा केलेल्या भागभांडवलापैकी २३ लाख ७० हजार रुपये असा १ कोटी २२ लाख ६६ हजार ६४० रुपयांचा अपहार झाला आहे.

या निधीचा योग्य प्रकारे विनियोग केल्याचे कोणतेही पुरावे मूळ दस्ताऐवज वगैरे कागदपत्र लेखा परीक्षकांना संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी सादर केलेली नाहीत. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी वरील निधीचा अपहार झाल्याचे समोर आले होते. तसेच शासकीय अनुदानाचा गैरवापर झाला असल्याने उप लेखापरीक्षक प्रशांत बळीराम दळवी (रा. ओरोस) यानी कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.

या प्रकरणी प्राजक्ता कदम हिच्यासह बारा संशयितांवर पोलिसानी विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल केला होता. तर या प्रकरणाचा अधिक तपास सिंधुदुर्ग आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. पी. बर्वे करीत होते . त्यांनी तपासाअंती प्राजक्ता कदम हिला अटक केली.
तिला मंगळवारी कणकवली येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी पक्षाच्यावतीने ?ड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयाकडे प्राजक्ता कदम हिच्या पोलीस कोठडीची मागणी करताना अपहार केलेल्या रकमेचे काय केले? तयार केलेल्या बोगस कागदपत्रांचा सखोल तपास करायचा आहे. अशी विविध कारणे मांडली.

दरम्यान, याप्रकरणी इतर संशयित आरोपीना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. तर इचलकरंजी येथील शिंदे नामक व्यक्तीच्या बँक खात्यावर अपहारापैकी ९० लाख रुपये जमा केल्याची माहिती समोर येत असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे समजते.

Web Title: Billions of abductions in industrial establishments; The woman was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.