शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Sindhudurg: भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 11:42 IST

वैभववाडीत मुसळधार; नद्यांना महापूर : अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी

वैभववाडी : तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने दाणादाण उडवली आहे. सर्व नद्यांना महापूर आला असून कुसुर, दिगशी, तिरवडे तर्फ खारेपाटण, उंबर्डे या भागात रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर पावसामुळे भुईबावडा घाटात छोट्या दरडी कोसळल्या होत्या. त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवून मार्ग सुरळीत केला.तालुक्यात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील तीन दिवसांत २८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सर्व नद्यांना महापूर आला होता. त्यामुळे कुसुर सुतारवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे कुसुर भुईबावडा वाहतूक ठप्प झाली होती. उंबर्डे-तिथवली मार्गावर कातकरवाडी व दिगशी येथे पाणी आले होते. त्यामुळे या मार्गाची वाहतूक काही काळ बंद होती. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.संततधार पावसामुळे भुईबावडा घाटात दोन ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साह्याने त्या दरडी हटवून मार्ग सुरळीत केला. कोल्हापूर मार्ग बंद असल्याने सध्या घाटात वाहतूक कमी आहे. यामुळे दरड पडल्याचा फारसा परिणाम वाहतुकीवर जाणवला नाही.तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घर, गोठे, संरक्षण भिंती कोसळून १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोकिसरे येथील संतोष पवार यांची संरक्षण भिंत ८० हजार, नाधवडे येथील अशोक गिते (गोठा) १२ हजार, आचिर्णे घाणेगडमधील जयवंत रावराणे घर ७० हजार, उंबर्डे मेहबूबनगर यासीन जेठी संरक्षण भिंत ६ हजार, आदम पाटणकर घर ४ हजार ५०० रुपये असे मिळून अतिवृष्टीमुळे १ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlandslidesभूस्खलनRainपाऊस