भंडारी समाज संस्थेच्या सदस्यांकडून दिशाभूल ?
By Admin | Updated: January 29, 2015 00:11 IST2015-01-28T22:26:59+5:302015-01-29T00:11:52+5:30
पोलिसांत तक्रार : संगनमताने खोटी कागदपत्रे सादर केल्याची तक्रार

भंडारी समाज संस्थेच्या सदस्यांकडून दिशाभूल ?
गुहागर : तालुका भंडारी समाज संस्थेच्या १४ सदस्यांनी संगनमताने मिळून, खोटी कागदपत्रे सादर करुन सभासदांची दिशाभूल केल्याची तक्रार सदस्य संदीप आत्माराम भोसले यांनी गुहागर पोलीस ठाण्यात केली आहे.संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये २००३ ते २००८ या कालावधीमध्ये अध्यक्ष शशिकांत बागकर, उपाध्यक्ष दिलीप गडदे, सचिव सुरेश देवकर, खजिनदार अनंत सुर्वे व सदस्य प्रमोद मोरे, भरत शेटे, मनोज पाटील हे कार्यरत होते. या कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्यानंतर सन २००८ ते २०१३ चा कलावधी कायद्याने आवश्यक असलेली नवीन कार्यकारिणी निवडून तसा बदललेला अहवाल धर्मादाय आयुक्त रत्नागिरी यांच्याकडे सादर करावा अशी सूचना संदीप भोसले यांनी केली होती. परंतु, त्याची कोणतीही दखल तत्कालीन कार्यकारिणीने घेतली नाही.२००३ ते २००८ या काळातील सचिव सुरेश देवकर यांचे ६ जानेवारी २०११ रोजी निधन झाले. २००८ नंतर नवीन कार्यकारिणीची नेमणूक झाली नसल्याने सुरेश देवकर हयात असताना आॅक्टोबर २००९ पर्यंत सचिव म्हणून संस्थेचे कामकाज पहात होते. हे तोपर्यंतच्या सभेचे इतिवृत्त संस्थेच्या रजिस्टरमध्ये सुरेश देवकर यांनी सचिव म्हणून सह्या केलेल्या आढळून येत आहेत. अशाप्रकारे वस्तुस्थिती असताना १८ आॅक्टोबर २०१३ रोजी दीपक शिरधनकर यांनी धर्मादाय आयुक्त, रत्नागिरी यांच्याकडे २००८ ते २०१३ या काळातील नवीन कार्यकारिणी बदललेला अहवाल सादर केला. हा अहवाल बेकायदेशीर असून, याबाबत संदीप भोसले यांनी धर्मादाय आयुक्तांकडे १२ नोव्हेंबर २०१३ रोजी कायदेशीर हरकत घेतली आहे. याबबात, दिपक भोसले यांनी धर्मादाय आयक्तांकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती मिळवल्या असता, २००९पर्यंत सुरेश देवकर हे सचिव म्हणून कार्यरत असताना या कागदपत्रात २००८पासून मनोज पाटील नामक व्यक्तीच्या सह्या आढळून येत आहेत. यासाठी दीपक ताराचंद शिरधनकर, नवनीत अशोक ठाकूर, भरत वासुदेव शेटे, मुरलीधर आत्माराम बागकर, मनोज नरसी पाटील, तुषार जगन्नाथ सुर्वे, महेंद्र सिताराम आरेकर, सुहास विठ्ठल शेटे, निलेश अनंत मोरे, सतीश वासुदेव शेटे, सुरेश कृष्णा शेटे, मंगेश चंद्रकांत गडदे, जगन्नाथ मनोहर बागकर, विजय धोंडू नार्वेकर आदी १४ जणांनी एकत्रित येऊन मनोज पाटील यांना संस्थेचे सचिव म्हणून बनावट कागदपत्रांवर सह्या करण्यास प्रोत्साहन दिले आहे.याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी सदस्य संदीप भोसले यांनी गुहागर पोलीस ठाण्याला दिलेल्या अर्जामध्ये केली आहे. (प्रतिनिधी)े