शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

भगवती मंदिराची दानपेटी फोडली, धामापूरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 4:13 PM

मालवण तालुक्यातील धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरातील दानपेटी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोयता, टिकाव व पहारीच्या सहाय्याने फोडून आतील सुमारे दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे भगवती मंदिराची दानपेटी फोडली, धामापूरमधील घटना १० ते १२ हजार रुपये लांबविले; श्वान, ठसेतज्ज्ञांद्वारे तपास सुरू

चौके : मालवण तालुक्यातील धामापूर येथील श्री देवी भगवती मंदिरातील दानपेटी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोयता, टिकाव व पहारीच्या सहाय्याने फोडून आतील सुमारे दहा ते बारा हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे.

मंदिरातील चोरीमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. ठसेतज्ज्ञ, श्वान पथकांच्या सहाय्याने सध्या तपास सुरू आहे. त्या अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धामापूर भगवती मंदिर परिसरातील रहिवासी राजेंद्र दाभोलकर हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता मंदिरात गेले असता नेहमी बंद असणारा मंदिराचा मुख्य दरवाजा त्यांना उघडा असल्याचे दिसून आले. त्यांना संशय आल्याने पुढे जाऊन पाहिले असता दरवाजाचे कुलूप तोडून खाली टाकल्याचे दिसले.

मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याची माहिती दूरध्वनीवरून मंदिराचे विश्वस्त दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर दत्तात्रय देसाई, कान्होबा देसाई यांनी भगवती मंदिरात धाव घेतली आणि दूरध्वनीवरून पोलिसांना मंदिरातील चोरीची कल्पना दिली आणि तपासासाठी पोलिसांना पाचारण केले.त्यानुसार पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, प्रसाद आचरेकर, कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी रुक्मांगत मुंडे, योगेश सराफदार, ठसेतज्ज्ञ संजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक विद्या कदम, के. टी. सोनावणे, श्वान पथक कर्मचारी एस. एस. देवळेकर, लुईस फर्नांडिस हे सर्वजण भगवती मंदिरात दाखल झाले. त्यांनी पाहणी करत पंचनामा केला.यावेळी दत्तात्रय देसाई, कान्होबा देसाई, सुनील देसाई, जयप्रकाश देसाई, सचिन देसाई, हनुमंत धामापूरकर, सीताराम धामापूरकर, मंदिराचे पुजारी देवेंद्र धोपेश्वरकर, धनंजय धोपेश्वरकर, आत्माराम धामापूरकर, शशिकांत गावडे आदी उपस्थित होते.अज्ञात चोरट्यांनी भगवती मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि मुख्य गाभाऱ्याच्या समोरील बंदिस्त भागाच्या कडेच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गाभाऱ्यासमोरील दानपेटीचा वरचा भाग टिकाव, कोयत्याच्या सहाय्याने उचकटून काढल्याचे दिसून आले.रँबो श्वानाने ग्रामपंचायत चढावापर्यंत माग काढलाश्वान पथकातील रँबो श्वान मंदिरासमोरील तलावाच्या बंधाऱ्यावरून जात स्मशानभूमी परिसरातून वाट काढत मुख्य रस्त्यावर आला आणि कुडाळच्या दिशेने जात धामापूर ग्रामपंचायतीच्या अलीकडील चढावापर्यंत त्याने माग काढला. त्यानंतर ठसेतज्जांनी चोरी झालेल्या ठिकाणचे ठसे घेतले आणि पुढील तपासासाठी पाठविले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिर