शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास खरे खून, दोघे पुण्यात ताब्यात

By admin | Updated: January 7, 2015 23:59 IST

याप्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, सुपारी देण्याचा तर हा प्रकार नाही ना, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळावयाची आहेत.

रत्नागिरी/गुहागर : गुहागरमधील कासवमित्र विश्वास खरे खूनप्रकरणाचे धागेदोरे सापडल्यानंतर आज पुणे येथे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. संशयितांना ताब्यात घेतल्याने या खूनप्रकरणातील सत्य बाहेर पडण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन पर्यटक वरचा पाट येथे विश्वास खरे यांच्या खरे प्लेझर पॉर्इंट येथे रहाण्यासाठी आले. सायंकाळी ६.३० वा. खरे यांचा मोठा भाऊ विवेक व पुतण्या सचिन यांना विश्वास खरे याचे खरे प्लेझर पॉर्इंट कुठे याची विचारणा केली. नेहमीप्रमाणे पर्यटक आहेत, असे समजून त्यांना राहण्यासाठी खोली देण्यात आली. रात्रभर या दोघांनी समुद्रकिनारी माडाच्या बनात असलेल्या खोलीमध्ये मुक्काम ठोकला. सकाळी ६.३० वा. विश्वास खरे यांच्या पत्नी या पर्यटकांसाठी चहा घेऊन गेल्या. त्यानंतर आॅर्डरनुसार सकाळी ९.३० वा. कांदापोहे देण्यासाठी गेल्या. यावेळी खरे तेथेच होते व वातावरण नेहमीसारखेच होते. यानंतर दोन तास होऊन गेले तरी खरे का आले नाहीत हे पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी पर्यटकांच्या खोलीकडे आल्या. खरेंचा आजूबाजूला शोध घेऊनही पत्ता न लागल्याने त्यांनी आपले दीर विवेक खरे यांना बोलावून आणले. त्यांनी कीचन शेडच्या दरवाजावरील कुलून तोडले. त्यावेळी विश्वास खरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे त्यांना दिसले. तपास सुरू असताना पोलिसांना खरे यांचा मोबाईल सापडला नाही. त्यामुळे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता खरे यांचा गायब झालेला मोबाईल ५ किलोमीटर्सच्या अंतरावर असल्याचे सिग्नल्स मिळत होते. त्यानंतर पुन्हा टॉवर टेस्टमध्ये घरापासून जवळच्या अंतरावर मोबाईलचे ठिकाण दिसून येत होते. त्यामुळे याप्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, सुपारी देण्याचा तर हा प्रकार नाही ना, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळावयाची आहेत. (प्रतिनिधी)