शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यीकरणात पडणार भर, रस्ता दुतर्फा झाडांची लागडवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 10:19 PM

सिंधुदुर्गनगरीमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा सावली तयार व्हावी तसेच वृक्षलागवडीने सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्गनगरीतील विविध रस्ता मार्गावर वृक्ष लागवड पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे नजिकच्या काळात फुलझाडांच्यामुळे नगरीच्या सौंदर्यीकरणात भर पडणार असून रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात सावली देणारे वृक्ष पहावयास मिळणार आहेत. 

सिंधुदुर्गनगरी  - सिंधुदुर्गनगरीमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा सावली तयार व्हावी तसेच वृक्षलागवडीने सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सिंधुदुर्गनगरीतील विविध रस्ता मार्गावर वृक्ष लागवड पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे नजिकच्या काळात फुलझाडांच्यामुळे नगरीच्या सौंदर्यीकरणात भर पडणार असून रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात सावली देणारे वृक्ष पहावयास मिळणार आहेत. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक व्ही. डी. सावंत याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, सिंधुदुर्गनगरी या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांचा समावेश आहे. बाजूच्या परिसरामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा रुग्णालय अशा अनेक अनिवासी इमारती तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणून महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या निवासी वसाहती आहेत. प्राधिकरणातील रस्ते सुशोभित करणे व प्राधिकरणाचे सौंदर्य वाढविणे,  रस्ता दुतर्फा ऐन, किंजळ यासाखी स्थानिक प्रजातीची व गुलमोहर, प्लेटोफॉर्म, आकेशिया या प्रजातीची झाडे विखुरलेल्या स्वरुपात लागवड केलेली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या संकल्पनेतून जिल्हा मुख्यालयात प्रवेश करताना सौंदर्यात भर पडावी म्हणून रस्ता दुतर्फा वर्षभर रंगीत फुले असणारी झाडे असावीत.  यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खाते व आय.आर.सी. यांच्या शहराअंतर्गत रस्ता दुतर्फा करावयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रस्त्याच्या लगत व इलेक्ट्रिक लाईनच्या खाली अथवा भूमीगत पाईपलाईन जवळ उंच वाढणारी तसेच फांद्या व मुळे पसरणारी झाडे लावू नयेत. अशा निर्देशानुसार  या क्षेत्रात कमी उंचीची वर्षभर फुले येणारी झाडे लावणेस भरपूर वाव होता व त्यातून एकसंघ जिल्हा मुख्यालय, रस्ता दुतर्फा सौंदयार्ने नटलेला दिसेल. अशाप्रकारे प्रस्ताव तयार करणेत आला.जिल्ह्याचे पालकमंत्री  दीपक केसरकर यांनी सदर प्रकल्पाअंतर्गत सिंधुदुर्गनगरी मध्ये फळ रोपांची लागवड करणेबाबत सूचना केली होती. त्यानुसार प्राधिकरण क्षेत्रामध्ये जैवविविधता उद्यान व स्मृती उद्यान येथे मोठ्या प्रमाणावर कोकणातील विविध फझाडांची लागवड करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी  उदय चौधरी यांनीही या लागवडी संदर्भात मौलिक सूचना केल्या होत्या. दोन हजार रोपांची लागवडजिल्हा सौंदर्यकरणात रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीने भर पडावी म्हणून कमी उंच वाढणारी कांचनच्या विविध प्रजाती, बहावाच्या विविध प्रजाती, रंगीत भोकर इत्यादी आणि योग्य त्या ठिकाणी सोनचाफा, प्लेटोफॉर्म, जाकरांडा,  स्पॅथोडीया इत्यादी उंच वाढणाºया प्रजातीची २ हजार रोपे लावण्यात आलेली आहेत. सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने एकाच प्रजातीची रोपे १०० मीटर पर्यंत रस्ता दुतर्फा एक पदरी व  दुपदरी विभाजकाच्या दोन्ही बाजूने लागवड केल्याने जिल्हा सौंदर्यीकरणाची उंची नक्कीच वाढणार आहे. सदर लागवड करतांना रोपा सभोवती टिकावू  कुंपण, प्लॅस्टिक मल्च, व जमिनीखालून पाणी घालणे अशा प्रकारच्या आधुनिक सुविधा निर्माण केल्या, तसेच रोपे लावताना ती किमान सहा फुटापेक्षा उंच असावीत याची दक्षता घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे हे महाराष्ट्रातले पहिलेच रोपवन असावे. असेही व्ही. डी. सावंत यांनी स्पष्ट  केले आहे.

टॅग्स :forestजंगलsindhudurgसिंधुदुर्ग