शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

निराधाराना दिला आधार; नूतन बालकाचे केले नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:24 IST

पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम वृद्ध निराधाराना आधार देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यातील पुढचा टप्पा म्हणजे कुणाचाही आधार नसलेल्या तरुणीला आणि तिच्या बालकाला आजी - आजोबांसह अनेक नातेवाईक मिळाले.

ठळक मुद्देनिराधाराना दिला आधार; नूतन बालकाचे केले नामकरणसंविता आश्रमाचा समाजासमोर एक नवा आदर्श !

कणकवली : पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम वृद्ध निराधाराना आधार देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कार्यातील पुढचा टप्पा म्हणजे कुणाचाही आधार नसलेल्या तरुणीला आणि तिच्या बालकाला आजी - आजोबांसह अनेक नातेवाईक मिळाले. तसेच त्या नवजात बालकाचा नामकरण विधीही कणकवली शहरालगतच्या वागदे गोपुरी आश्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या उपक्रमातून एक नवा आदर्श संविता आश्रमाचे संचालक संदीप परब यांनी समाजासमोर घालून दिला आहे. त्यामुळे त्यांचे समाजातून कौतुक केले जात आहे.कुमारी माता झालेल्या एका तरुणीचा समाज आणि नातेवाईकांनी स्वीकार करण्यास नकार दिला. आता आपणाला कुणाचा आधार मिळेल या विवंचनेत असलेल्या त्या तरुणी बाबत माहिती संविता आश्रमाचे संचालक संदीप परब यांना मिळाली ते तिच्यासाठी व तिच्या नवजात बालकासाठी देवदूत बनले . आश्रमाच्या माध्यमातून माता आणि बालकाचा सांभाळ आपण करू याची हमी देत परब यांनी त्या बाळाला आणि त्याच्या आईला आपल्या आश्रमात आश्रय दिला.त्यानंतर रविवारी कणकवली तालुक्‍यातील प्रतिष्ठित नागरिक आणि संविता आश्रम यांच्यावतीने त्या नवजात बालकाचा नामकरण विधी सोहळा वागदे गोपुरी आश्रम येथे थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी "साहस' असे नामकरण झालेल्या बालकाला शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यासाठी कणकवलीवासीयांनी गर्दी केली होती. तसेच त्या बालकाचे शिक्षण आणि करिअरसाठी मदत करण्याचीही ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.परंपरेच्या नावाखाली अनेक बालकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अथवा नाकारणाऱ्या समाजाला संविता आश्रमाच्या या कृतीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अनेक निराधारांना आधार देणारा संविता आश्रम आणि त्याचे संचालक संदीप परब यांचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगत उपस्थितांनी यावेळी त्यांचे कौतुक केले . तसेच या सामाजिक कार्यासाठी त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांच्या या कार्यात त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :children's dayबालदिनsindhudurgसिंधुदुर्ग