शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न : जठार

By admin | Updated: October 19, 2014 22:45 IST

राज्यात सरकार आले याचा आनंद जास्त आहे

कणकवली : पराभव झाला या दु:खापेक्षा राज्यात सरकार आले याचा आनंद जास्त आहे. केंद्र व राज्यातील सत्तेच्या आधारे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेणार असल्याचे प्रतिपादन प्रमोद जठार यांनी केले. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजन म्हापसेकर, रंगनाथ गवस, शिशीर परूळेकर, बबलू सावंत आदी उपस्थित होते. राणे कुटुंबीयांच्या विरोधातील मतांमध्ये विभागणी झाल्याने पराभव झाला. तो मी मान्य करतो. मतविभागणी टाळता आली असती तर चित्र बदलले असते. परंतु पैशापुढे बाकी सर्व फिके पडते हे दिसून आले. ज्यांनी आपणास मतदान केले त्या सर्वांचा आभारी आहे. कुडाळ मतदारसंघातून जिंकलेले वैभव नाईक आणि सावंतवाडीतून जिंकलेले दीपक केसरकर या दोघांचे अभिनंदन करतो, असे जठार म्हणाले.विरोधी पक्षाचा आमदार असताना जेवढे काम केले नाही. तेवढे आता आमदार नसताना करून दाखवेन. त्यासाठी केंद्र व राज्यातील सत्तेचा वापर केला जाईल. भाजपा कार्यकर्त्यांनी या पराभवाने विचलित होऊ नये. तिनही ठिकाणी पराभव झाला तरी केंद्र व राज्यातील सत्ता व्यवस्थित राबवली तर भविष्यात सर्व सत्तास्थाने काबीज करू शकतो. पक्षश्रेष्ठी आपली काळजी घेण्याचा निश्चित प्रयत्न करतील. नारायण राणेंच्या पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. नारायण राणेंच्या पराभवाच्या दु:खापेक्षा आपले दु:ख मोठे नाही. हरलो तरी राजकीय रिंग्ांणात राहून विकासकामांचा पाठपुरावा करू असे सांगून पराभव पचवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जठार यांनी केले. (प्रतिनिधी)