शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: अधिकाऱ्याला दारूच्या बाटल्यांचा हार घालण्याचा प्रयत्न, मनसे पदाधिकाऱ्यांकडून ढिसाळ कारभाराचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:56 IST

आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

कुडाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी नाराजी व्यक्त केली. परब यांनी सोमवारी मनसे पदाधिकाऱ्यांसह थेट राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ कार्यालयावर धडक दिली. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार निरीक्षकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा उपरोधिक निषेध या प्रकारे त्यांनी केला.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यात अवैध दारू विक्रीची ठिकाणे आणि त्यामागे कार्यरत असलेल्या यंत्रणांची सविस्तर माहिती चार महिन्यांपूर्वी पत्र देऊन राज्य उत्पादनशुल्कच्या अधिकाऱ्यांना दिली होती. परंतु, चार महिने उलटूनही कारवाई न होता. राजरोसपणे गोवा बनावटीची दारु विक्री सुरूच राहिली. म्हणून हे आंदोलन करण्यात आले. सोमवारी अवैध दारु विक्रेत्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाकडे नव्याने देण्यात आली. सात दिवसात धंदे बंद न झाल्यास जिल्हा अधीक्षक कार्यालयाच्या दालनात आंदोलन करणार येईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे, गजानन राऊळ, अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, शाखाध्यक्ष अनिकेत ठाकूर, महाराष्ट्र सैनिक सुरज नेरूरकर, विष्णू मसके, वल्लभ जोशी, रोशन ठाकूर आणि अजय जोशी आदी उपस्थित होते. मनसेच्या या आंदोलनामुळे अवैध दारू विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.