शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

'कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती अन् संस्कारात बसत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 11:35 AM

कलम 353 मध्ये बदलाची मागणी करणार, नितेश राणेंची भूमिका.

ठळक मुद्देकलम 353 मध्ये बदलाची मागणी करणार, नितेश राणेंची भूमिका.आमचं आंदोलन लोकांचं, लोकांसाठी केलेलं आंदोलन होतं. जनतेच्या आदेशावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोतआपल्या आंदोलनासंदर्भात त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली.

सिंदुदुर्ग - चिखलफेक आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत गेलेल्या आमदार नितेश राणेंना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर, सुटका होऊन बाहेर येताच, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या आंदोलनासंदर्भात त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. माझं आंदोलन हे जनतेचं आंदोलन होतं. जनतेसाठी आंदोलन होतं. त्यामुळेच, अनेक सामाजिक संघटना, संस्था आणि लोकांनी आम्हाला पाठींबा दिला. त्यामुळे आम्हाला आतमध्ये ऊर्जा मिळाली. त्या सर्वांचे मी आभार मानतो, असे नितेश राणेंनी म्हटले.    

आमचं आंदोलन लोकांचं, लोकांसाठी केलेलं आंदोलन होतं. जनतेच्या आदेशावर चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जेव्हा मी आमदार म्हणून निवडून गेलो, तेव्हा मी एक शपथ घेतली होती. मी माझ्या जनतेची प्रामाणिकपणे सेवा करील, असे मी त्यावेळी म्हटलं होतं. कोणालाही मारणं, कोणावरही हल्ला करणं आमच्या संस्कृती आणि संस्कारात बसत नाही. आजही मला वाटतं, महाराष्ट्रातील सर्व अधिकारी वर्गाला मी सांगू इच्छितो की, तुम्ही प्रामाणिकपणे काम केलंत. तुम्ही जनतेची सेवा केलीत, ज्यासाठी तुम्हाला ही खुर्ची आणि पद दिलं आहे. तर अशा पद्धतीची आंदोलन कुठेही होणार नाहीत. जेव्हा बैठका, आंदोलनं, निवेदन हे पर्याय जेव्हा संपतात तेव्हाच अशा पद्धतीची आंदोलन होतात, असे म्हणत नितेश राणेंनी त्यांच्या कृतीचं एकप्रकारे समर्थन केलं आहे. जिल्हा न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आमदार नितेश राणेंनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. 

सरकारी अधिकारी वर्गाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं, तर अशी आंदोलन होणार नाहीत. कायद्यातील कलम 353 हे कवच म्हणून वापरा, शस्त्र म्हणून नको, ज्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत होतो. पुढच्या टर्ममध्ये संधी मिळाली तर कलम 353 मध्ये बदल करण्याची मागणी मी करणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. या आंदोनलादरम्यान, जुन्या शिवसेनेच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना आम्हाला पाठींबा दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असेही राणेंनी म्हटलं. दरम्यान, उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. जामीन मंजूर करतानाही न्यायालयानं काही अटी-शर्थी ठेवल्या आहे. या प्रकरणात नितेश राणेंना पोलिसांना सहकार्य करावं लागणार असून, अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा होणार नसल्याचीही ग्वाहीही त्यांनी दिली आहे. तसेच कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दर रविवारी नितेश राणेंना हजेरी लावावी लागणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.  

 

 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाCourtन्यायालयMLAआमदार