Crime News sindhudurg: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, कासार्डे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 13:44 IST2022-06-09T13:42:33+5:302022-06-09T13:44:50+5:30

पहाटे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Attack on a businessman at Kasarde on the Mumbai Goa highway | Crime News sindhudurg: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, कासार्डे येथील घटना

Crime News sindhudurg: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, कासार्डे येथील घटना

कणकवली : मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यावसायिकावर कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर प्राणघातक हल्ला झाला. तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे (रा. कासार्डे ,जांभळगाव) असे जखमीचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोर त्यांचा मोबाईल घेवून कणकवलीच्या दिशेने पसार झाले.

डंबे हे पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. कासार्डेहून तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दुचाकीवरून तीन अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी डंबे यांनी प्रतिकार केल्यानंतर अज्ञातांनी त्यांच्यांवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी हातातील सोन्याची अंगठी व पैसै हुसकावण्यासाठी सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला.

डंबे यांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर त्यांचा मोबाईल घेवून कणकवलीच्या दिशेने पसार झाले. या हल्ल्यात डंबे यांच्या नाकावर जखम झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी डंबे यांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

कणकवली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत माहिती घेऊन तपास सुरू केला आहे. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Web Title: Attack on a businessman at Kasarde on the Mumbai Goa highway