शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:37 IST

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'ओलावा' चित्रप्रदर्शनाचे कौतुक केले.चित्रकार आपल्या कुंचल्यातून जी चित्रे रेखाटतो ते समाजनिर्मितिचे काम आहे.एक प्रकारे ही देशभक्ती आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ठळक मुद्देचित्रकाराच्या कुंचल्यातून घडणारी कलाकृती समाज हिताचीच :मधुसूदन नानिवडेकरओलावा' चित्रप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी रंगली गझल मैफिल

कणकवली:'रंगरेषातून आला पांघरून ओलावा..माणसाने माणसाला नेहमी आधार द्यावा...' अशा शब्दात गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी अखंड लोकमंच आणि सिधुदुर्गातील चित्रकारांच्या वतीने पुरग्रस्तांच्या  मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'ओलावा' चित्रप्रदर्शनाचे कौतुक केले.चित्रकार आपल्या कुंचल्यातून जी चित्रे रेखाटतो ते समाजनिर्मितिचे काम आहे.एक प्रकारे ही देशभक्ती आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.मधुसूदन नानिवडेकर यांच्या उपस्थितीत 'ओलावा' चित्रपदर्शनाचा समारोप करण्यात आला. यावेळी अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक, व्ही.के.सावंत, मोहन कुंभार,कल्पना मलये, सरिता पवार, राजन चव्हाण , गोपीकृष्ण पवार,संतोष राऊळ, विनायक सापळे, अच्युत देसाई, महेंद्र चव्हाण, अजित पारधीये,श्रीमती पाटणकर,शैलजा कदम, योगदा राऊळ,मैत्रेयी चव्हाण,सुनील कांबळे,वेद पेडणेकर आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी मधुसूदन नानिवडेकर म्हणाले, ' जेथे काही उत्तम चाले,तेथे आपण जावे,त्यांच्यासंगे आपण आनंदाचे गाणे गावे.' असे आमचे तत्व आहे. जोंधळ्याचे तात्पुरते मोती झाल्यासारखे वाटतात . मात्र , ते शाश्वत नसते.शाश्वत असते ती फक्त कला.कवी असलेले कविमनाचे असतीलच असे नाही. कलेला कधीही मंदि नसते. असे सांगून आजच्या समाज व्यवस्थेवर त्यांनी भाष्य केले.समाजाशी संवाद साधतो तोच खरा कलाकार.अखंड लोकमंच सारख्या संस्था कार्यरत असल्या मुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले आहे असेही ते म्हणाले.मधुसूदन नानिवडेकर यांनी अनेक कविता आणि गझला यावेळी सादर केल्या.' या कालप्रवाहावरती मी दीप सोडला आहे..परी विझता विझता त्याने नवलाख दीप उजळावे ' , अशा कवितेतूनच त्यांनी रसिकानाही आवाहन केले.' कसे मी जगावे स्वभावाप्रमाणे...तुलाही हवा मी ठरावाप्रमाणे...खुला राजरस्ता समोरून आहेतरी धाप लागे चढावा प्रमाणे...जुना बुटरस्ता फुलाना विचारीनवा बूट वाजे खडावाप्रमाणे ..असा राग येतो तुझा रोज जरीतरी हसतो मी सरावाप्रमाणे...अखेरीस ती त्यास सांगून गेलीअरे तू मला फक्त भावाप्रमाणे....'त्यांनी सादर केलेल्या या गझलेने समारोप कार्यक्रमात रंगत आणली.' तुझे नी माझे प्रेम केवढेया दुनियेला आली भोवळधनादेश सत्तर रुपयांचापाऊणशे त्याची वटनावळ...तू ते शंभर नंबरी सोनेकाय द्यावी मी तुझी घडणावळ...' या कविते बरोबरच' गाव हा राहिला नाही मोगऱ्याचा,चेहऱ्याला वास येतो अत्तराचावाचले सारेच मी जाहीरनामे,

घोषणातून फरक नाही अक्षराचा ' या गझलेने त्यांनी समाज व्यवस्थेवर आसूड ओढले. त्यानंतर 'हरकत नाही' या कवितेने नानिवडेकर यांनी रसिकांची मने जिंकली. व्ही.के.सावंत यांच्या हस्ते नानिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला . मोहन कुंभार यांनी सुत्रसंचालन केले.कणकवली येथे ' ओलावा' चित्रप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचा सत्कार व्ही. के. सावंत यांनी केला. यावेळी नामानंद मोडक, मोहन कुंभार आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग