शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या समस्यांना मोबाईलवर उत्तर

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

जिल्हा परिषद : ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’ने मार्गदर्शन

रहिम दलाल -रत्नागिरी  डायल आऊट कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सहाय्याने रिलायन्स फाऊंडेशन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी घरी बसून त्याचा लाभ मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील मच्छीमार आणि गरोदर महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे मार्गदर्शन आदी कामे जिल्ह्यात रिलायन्स फाऊंडेशनने सुरु केली आहेत. आता त्याची आणखी एक जोड शेतकरी व पशुपालकांना दिली जात आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्या जाणवत असतात. मात्र, त्या समस्या घरी बसूनच सोडण्याच्या दृष्टीने मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करुन कसा करता येईल, त्याकडे रिलायन्स फाऊंडेशनने लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन जिल्हा परिषदेचे सहकार्य घेत आहे. रिलायन्स फाऊंडेशनने मत्स्य खात्याच्या सहाय्याने जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी विविध योजनांची माहिती आणि त्यांना आधुनिक मासेमारीचे ज्ञान देण्यासाठी अनेक मार्गदर्शन शिबिरे घेतली. मच्छीमारांना ते समुद्रात जाण्यापूर्वी त्यांना वातावरणाची माहिती, धोक्याचा इशारा देण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशने गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरु केले. त्यासाठी रिलायन्स फाऊंडेशने प्रत्येक नौका मालकाचा मोबाईल क्रमांक घेऊन वेळोवेळी एसएमएसच्या द्वारे मच्छीमारांना अ‍ॅलर्ट करण्याची भरीव कामगिरी केली. काहीही आर्थिक फायदा न घेता मच्छिमारांना मोफत सेवा देत असतानाच आता शेतकरी, पशु-पालक यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन करण्यास या फाऊंडेशनने जिल्ह्यात सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा आधार घेतला आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २०० शेतकरी व पशुपालकांना त्यांच्या समस्या जाणून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवातही करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील २० पशुपालक व शेतकऱ्यांशी डायल आऊट कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकाच वेळी थेट संपर्क साधून त्यांच्याशी वार्तालाप करण्यात आला. त्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष अधिकारी यांनी मोबाईल कॉन्फरन्सच्या माध्यमातून पशुपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना डॉ. म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी व पशुपालकांसाठीचा पहिला प्रयोग यशस्वीही झाला.रिलायन्स फाऊंडेशनने सुरु केलेला उपक्रम शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे त्यांना घरी बसून समस्यांवर मार्गदर्शन मिळणार आहे. शेतकरी व पशुपालकांसाठी प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. - डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.